शेवटचा श्वास घेत होता पती आणि पत्नी म्हणाली मला मूल हवे आहे, मृत्यूपूर्वी देऊन गेला या प्रकारची प्रेमाची निशाणी …

Daily News

भारतीय परंपरेत लग्न ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीची सासरच्या घरी पाठवणी करण्याची पद्धत आहे व ही आपली परंपरा भारतात अनेक वर्षे नव्हे, वर्षानुवर्षे चालत आली आहे की जेव्हा एका मुलीचे लग्न होते व ती आपल्या सासरी येते, तेव्हा तिचे सासू व सासरेच तिचे आई वडील होतात व तिचा पतीच तिच्यासाठी सगळे काही असतो. आपल्या मुलींना तशी शिकवण असते की आता सासू सासरे हेच तुझे आई वडील आहेत.

पण पतीची गोष्ट वेगळी असते. त्याच्या विश्वासावरच ती सासरच्या घरी पाऊल ठेवते. कारण लग्नानंतर एक पतीच असा असतो, जी त्याला आपली सुख दू:ख सांगू शकते. तोच तिचा मुख्य आधार असतो. याच पद्धतीने, एक पती व पत्नीमधील प्रेमसं बंधांची गोष्ट समोर आली आहे, जिथे त्या महिलेच्या पतीने मृत्यूपूर्वी आपल्या अनोख्या प्रेमाची निशाणी आपल्या पत्नीला दिली. याबाबतीत असे सांगितले गेले आहे की, गुजरातमध्ये राहाणारी एक तरुणीचे कॅनडा येथे ऑक्टोबर २०२० मध्ये लग्न झाले होते.

लग्न झाल्यानंतर ४ महिन्यांनी तिला असे समजले, की गुजरातमध्ये तिच्या सासर्यांहची हृदयवि कार झाल्यामुळे तब्येत बिघडली आहे. त्यानंतर तिला आपल्या पतीबरोबर भारतात गुजरातमधील वडोदरा येथे यावे लागले. पण ती जेव्हा भारतात आली, तेव्हा भारतात कोरोंनाच्या महामारीचा कालावधी होता.

त्याच सुमारास संसर्गाने तिचा पती कोरोंनाने आजारी पडला. कोरोंनाच्या विळख्यामुळे तिच्या पतीची १० मे रोजी अवस्था खूप नाजुक झाली. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला व कोरोंनामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.

तसे तर या कोरोंनाच्या महामारीमुळे सगळ्या लोकांचे जीवन पुर्णपणे अस्ताव्यस्त झाले आहे. कोणाच्या हातातील काम गेले, कोणाची नौकरी गेली तर कोणी रुग्णालयात दाखल झाले. कोरोंना झाल्यामुळे आता त्या महिलेचा पती दोन महिन्यापासून एका खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे.

डॉक्टरांनी सांगितले की त्याची तब्येत व परिस्थिति खूपच गंभीर झाली आहे,तो जीवन-मरणाच्या दारात आहे व आता तो ४८ तासापेक्षा जास्त कालावधी जिवंत राहू शकणार नाही. या डॉक्टरांच्या म्हणण्यावर पतीला गमावण्याच्या भीतीपोटी दू:खि झालेल्या व गडबडलेल्या तरुणीने गुजरात हायकोर्ट उच्च न्यायालयात धाव घेतली.

खरे म्हणजे एक महिला लग्न झाल्यानंतर पतीबरोबर आपले सुखमय जीवन व्यतीत करण्याची व परिवाराला वाढविण्याची स्वप्ने बघते. पण त्या तरुणीच्या नशिबात असे लिहिलेले नव्हते. पण ह्या तरुणीने हार मानली नाही. त्यानंतर त्या तरुणीने हायकोर्टच्या समोर विनवणी केली की, मला माझ्या पतीचे शुक्राणू पाहिजेत, ज्यामुळे मी त्यांच्या मुलाला जन्म देऊ शकेन. परंतु, याची परवानगी मेडिकल का यद्याने दिली नाही.

खरे तर, महामारीच्या या कालावधीत अशा अनेक प्रकारच्या बातम्या ऐकायला मिळत होत्या, ज्या ऐकून माणसे भावुक झाली होती. पण पत्नीने खूप प्रयत्न केल्यानंतर, शेवटी हायकोर्टाने सगळ्या सुनावण्या थांबवून प्रथम हा मामला ऐकून घेतला. तेव्हा कोठे या प्रकरणाची कारवाई सुरू झाली व १५ मिनिटाच्या आतमध्ये फोनवरुन स्टर्लिंग हॉस्पिटलला आय.व्ही.एफ प्रक्रियेचा आदेश दिला गेला.

आजपर्यंतच्या इतिहासात साधारणपणे असे प्रथमच झाले आहे, जेव्हा हायको र्टने सगळी सुनावणी थांबवून एक पतीसाठी रडणार्याा व दू:खि असलेल्या पत्नीची विनवणी ऐकली. पत्नीने आपल्या पतीच्या अंतिम काळात त्याच्या प्रेमाची निशाणी मिळविण्यासाठी गुजरात हायको र्टाचा दरवाजा ठोठावला व कोर्टाने तिला न्याय मिळवून दिला. ती तिच्या प्रयत्नात यशस्वी झाली.