देवी लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते. अशी मान्यता आहे, की पैशाशी निगडीत सर्व समस्या देवी लक्ष्मी सहज दूर करते जर आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवले.
देवी लक्ष्मीची कृपादृष्टी एकदा एखाद्या भक्तीवर पडली व देवी लक्ष्मी आनंदी झाली तर त्या व्यक्तीची भरभराट होते, त्याच्या घरात पैशाची कमतरता कधीच येत नसते. पण देवी लक्ष्मीच्या कृपेपेक्षा अधिक धोकादायक आहे ते म्हणजे देवी लक्ष्मी नाराज होणे, तिला तुमच्या वागण्याचा त्रास होणे.
एकदा जर देवी लक्ष्मी कोणावर कोपली, तर मात्र तिचा राग आपल्याला भरपूर काळ अनुभवावा लागतो. देवी लक्ष्मीची नाराजी झाली तर रावाला रंक म्हणजेच लक्षाधीशाला भिकारी बनवायला तिला वेळ लागत नाही. त्याच्या पैशाची सतत हानी होऊ लागते. म्हणून, जसे लक्ष्मी देवीला प्रसन्न करणे महत्वाचे आहे, तसेच ती आपल्यावर नाराज होऊ नये हे लक्षात ठेवणे खूपच गरजेचे आहे.
पण यासाठी काय केले पाहिजे, हे आज आम्ही सांगणार आहोत. काही चुका शुक्रवारच्या दिवशी केल्या तर मात्र देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल. कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे. पण आम्ही तुम्हाला सावध करतो, की फक्त शुक्रवारी नाही तर इतर कोणत्याही दिवशी या चुका करू नका, ते तुमच्या भविष्यासाठी चांगले नाही.
लहान कन्येला दुःख देणे:- आपल्याकडे असे मानले जाते, की लहान मुलीं या लक्ष्मीचे रूप आहेत. काही घरात तर पूर्वापार लहान कन्यांचे पूजन केले जाते. तुमची अशी इछा असेल, की देवी लक्ष्मी आनंदी राहावी, तर आपल्या घरातील लहान मुलींना कायम आनंदी ठेवा.
म्हणून, शुक्रवारच्या दिवशी घरातील किंवा घराबाहेरील, मुलींना खुश ठेवा, दू:खी करू नका. चुकून तुमच्या हातून चूक झाली तर मात्र तुम्हाला देवी लक्ष्मीच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. म्हणून, लहान मुलींना आनंदी ठेवा, त्यांच्या इछा पूर्ण करा, ज्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुख-समृद्धि, धन देतील.
गृहलक्ष्मीचा अपमान:- आपल्या घरची सून ही गृहलक्ष्मी असते, तिचा आपण कायम आदर केला पाहिजे. ज्या घरातील स्त्रियांना नेहमी हीन वागणूक दिली जाते, त्यांचा योग्य मान ठेवला जात नाही, अशा घरात देवी लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही.
स्त्रीचा अनादर म्हणजेच लक्ष्मीचा अपमान मानला जातो. तसेच, शुक्रवार किंवा इतर कोणताही वार असो, कोणत्याही महिलेवर अत्याचार झाला, तर देवी लक्ष्मी नाराज होऊन ते घर सोडून जाते. त्यामुळे घरात किंवा घराबाहेर ही चूक आपल्या हातून होता कामा नये.
पूजा करताना मनाची शांतता :- जेव्हा जेव्हा आपण देवी लक्ष्मीजींची पुजा करून, पोथी वाजतो, तेव्हा आपले मन पुर्णपणे शांत असणे आवश्यक आहे. पूजा करताना कोणाबद्दल मनात राग मत्सर किंवा हीन भावना असू नये. तसेच आपण जिथे पूजा करतो,
त्या खोलीतील वातावरण शांत आणि सकारात्मक असले पाहिजे. जर तुमच्या घरात वाद विवाद होत असतील आणि तुमचे मन उद्विग्न असेल, विचलित होत असेल तर तुम्ही अस्वस्थ मनाने देवी लक्ष्मीची पूजा करू नका.
कारण नकारात्मक उर्जेने केलेल्या लक्ष्मीच्या पूजेचा विपरीत परिणाम होतो आणि तुमच्या जवळील पैशाचे अमाप नुकसान तर होतेच पण दुर्दैवाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. म्हणून, आपण अशा प्रकारच्या चुका करणे नेहमीच टाळले पाहिजे.
तर मित्रांनो तात्पर्य हेच की अशा तीन प्रकारच्या चुका तुम्ही शुक्रवारी तसेच कोणत्याही दिवशी करू नयेत. आमची ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका.