वेश्येने सांगितली कहाणी,लॉकडाउन चालू असतांना अश्या प्रकारे जगत आहे से-क्स वर्कर्स आयुष्य …

Daily News

आज आपल्या देशात जे कोरोनाचे संकट आले आहे त्यामुळे व त्यानंतर सरकारने जाहीर केलेल्या  लॉकडाऊनमुळे अनेक लोक अडचणीत आले आहेत. अनेक कामगार जे रोजगारावर आहेत त्यांची परिस्थिति लॉकडाऊनमुळे अत्यंत बिकट झाली आहे. यामध्ये अनेक लोकांचा समावेश आहे, त्यातील एक म्हणजे देह व्यवसाय करणाऱ्या महिलांवर तर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोंनाच्या या संकटात देशामध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आले त्यामुळे या परिस्थितित त्यांच्याकडे एकही ग्राहक आलेला नाही. या अशा बिकट परिस्थितीत त्यांचे उत्पन्न पूर्णत: थांबले असल्याने त्यांना व त्यांच्या परिवाराला आलेला दिवस काढणे अत्यंत हलाखीचे झाले आहे.सेक्स वर्कर्सची मुले आता आहेत पगाराच्या प्रतीक्षेत :- मी तुम्हाला राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील से-क्स वर्कर नमिता हिच्या समस्येविषयी सांगणार आहे.

नमिता म्हणते, आमचा धंदा असा आहे, की तिथे आम्हाला रोज पैसे मिळवावे लागतात व त्यावर आमचे घर चालते. पण आम्ही सेक्स वर्कर्स आहोत हे आमच्या घरातल्या कोणालाही ठाऊक नाही. प्रत्येकाचा असा समज आहे, की  आम्ही ऑफिसमध्ये काम करण्यासाठी जात आहोत व तसेच आम्ही त्यांना भासवले आहे, कारण मजबूरी आहे.

सरकारने जेव्हा लॉकडाऊन जाहीर केले, तेव्हा आमच्या घरातील लोकांना वाटले, की आम्ही कामावर गेलो नाही तरी आम्हाला पैसे मिळतील.आमची मुलेही अस्वस्थ आहेत. मी त्यांना सांगावे का, की तुझी आई एक से-क्स वर्कर आहे? माझा नाईलाज होता, असहायता होती म्हणून मी या व्यवसायात प्रवेश केला  होता.

नवरा दारुड्या, मुले लहान त्यांना खायला घालते नवर्यातला दारूला पैसे लागतात, घरातील खर्च मग हे सर्व करण्यासाठी  मला हे काम करावेच लागले. आता ह्या लॉकडाऊनमुळे माझे कामही थांबले आहे, व काम नाही तर पैसा नाही.

नमिता आपल्या या व्यवसायाबद्दल सांगते आणि तिचे म्हणणे आहे, की लोकांना या कोरोना विषाणूची भीती वाटते त्यामुळे आता मला वाटत नाही की कोणी आमच्याकडे पुढील ६ ते ७ महीने येईल. ही समस्या फक्त नमिता पुरती मर्यादित नाही तर तिच्यासारख्या इतर अनेक से क्स वर्कर्सही आहेत ज्या सगळ्या या संकटाला सामोर्याण जात आहेत.

आपल्या देशात नमिताप्रमाणेच या व्यवसायाशी सं बंधित कोट्यावधी से क्स वर्कर्स आहेत ज्या सर्वांची हीच समस्या आहे व त्यांना आता काळजी वाटत आहे, की आपले घर चालणार कसे? त्यात वाढलेल्या लॉकडाऊनची भर पडल्यामुळे त्यांच्या त्रासात भर पडली आहे.

लॉकडाउनने उपासमारीची परिस्थिती आली आहे:- महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एक अहवालानुसार देशात 30 लाख से क्स वर्कर्स असून त्यातील नमिता ही एक आहे. ह्यूमन राइट्सने सादर केलेल्या अहवालानुसार भारतात सुमारे २ करोड से क्स वर्कर्स आहेत आणि या व्यवसायाशी सं बंधित आहेत.

दिल्लीतील एका से क्स वर्कर्सचे असे म्हणणे आहे, की  लॉकडाऊन जर लवकर बंद झाले नाही, तर मात्र आमच्या कुटुंबाला उपासमारीचा सामना करावा लागेल जो आम्ही आताही करतो आहोत.  सरकारने रातोरात लोकडाउन जारी केले, त्यामुळे आम्हाला या येणार्या  दिवसांच्या तयारीसाठी पुरेसा वेळच मिळाला नाही.

से क्स वर्कर्सची संख्या ही देशातील एक मोठी लोकसंख्या आहे, जे देशात आहेत, पण सरकार त्यांना मदत करण्यासाठी सर्व योजनांमध्ये भागच देत नाहीत. या से क्स वर्कर्सकडे त्यांची अशी रेशनकार्ड नसल्याने हजारो से क्स वर्कर्सना सरकारी रेशन मिळत नाही, जे आता रेशनधारकांना फुकट मिळते आहे.

या ठिकाणी सतत काम करणाऱ्या किती तरी  महिला ए चआ यव्ही पॉ झिटिव्ह सारख्या भ यंकर आ जाराने पीडित आहेत पण इलाज करण्यासाठी त्यांना रुग्णालयात जाण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. कर्नाटकातील कोलार या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या से क्स वर्कर्सही अशाच त्रासातून जात आहेत.

त्यांनी असे सांगितले की आम्ही ज्या भागात राहतो तथे ३ हजार वर्कर्स आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये रोड बेस्ड आधारित से क्स वर्कर्सना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यांना एक वेळच्या जेवणापासून वंचित राहावे लागते आहे पण या कठीण परिस्थितित सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही.

ही काही रे ड लाइट क्षेत्र खूप लोकप्रिय आहेत:- आपल्या देशामध्ये बरीच रेड लाईट क्षेत्र आहेत, जी नेहमीच चर्चेत असतात. कलकत्ता येथील सोनागाछी हे आशियातील सगळ्यात मोठे रेडलाइट क्षेत्र मानले जाते. हा एक अतिशय लोकप्रिय रेड लाईट भाग आहे.

या व्यवसायात या भागात किमान तीन लाख महिलांचा सहभाग आहे. दुसर्यार क्रमांकाचा भाग आहे तो म्हणजे मुंबईतील कामाठीपुरा आहे. तेथे दोन लाखांहून अधिक से क्स वर्कर्स आहेत. यानंतर दिल्लीच्या जी.बी रोड, आग्रा मधील काश्मिरी मार्केट, ग्वाल्हेरचा रेशमपुरा, पुण्यामधील बुधवार पेठ हे देखील लोकप्रिय आहेत.

हे सेक्स वर्कर्स केवळ देशातील मोठ्या शहरांपुरते मर्यादित नाहीत. अगदी छोट्या शहरांपैकी वाराणसीतील मदुडिया, मुझफ्फरपुरातील चतुर्भुज, आंध्र प्रदेशातील पेद्दापुरम आणि गुडविदा सहारनपुरातील नकफसा बाजार, अलाहाबादमधील मीरगंज,  नागपुरातील गंगा जमुनी आणि मेरठमधील काबडी बाजार ही से क्स वर्कर्स क्षेत्रासाठी प्रसिध्द आहेत. येथे राहणारे काही सेक्स वर्कर्स दुसर्यार शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत, तर काही या बंद रस्त्यावर आपले दिवस कसेबसे घालवत आहेत. त्यांच्याकडे राहायला घर नाही, त्यांच्याकडे खाण्यापिण्याची व्यवस्था नाही.

आपल्याकडे से क्स वर्कर्सना कोणताही सरकारी लाभ मिळत नाही:- ऑल इंडिया नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स ऑर्गनायझेशनशी सं बंधित “कुसुम” से क्स वर्कर्सचे हित आणि हक्कांसाठी काम करते. कुसुम म्हणतात की जे घरगुती से क्स वर्कर्स आहेत ते खूप काळजीत आहेत. जी. बी रोडवरील काही से क्स वर्कर्सपर्यंत पोहोचून काही स्वयंसेवी संस्था त्यांना देखील मदत करीत आहेत, परंतु बाकी शहरातील से क्स वर्कर्सबद्दल कोणालाही कोणत्याही प्रकारची माहिती नाही. त्यांची मोजदाद ठेवणे देखील कठीण आहे. जर आपण इथे फक्त एका कॉलनीबद्दल बोललो, तरी त्यामध्ये जवळपास ५०० महिला होम बेस्ड सेक्स वर्कर्स आहेत.

येणार्याम काळात गोष्टी आणखी बिघडू शकतात:- से क्स वर्कर्सना लोक खूप श्रीमंत मानतात, परंतु तसे नाही, त्यांचे दु: ख फक्त त्यांनाच कळू शकते. त्यांच्या कामाला कोणताच दर्जा मिळाला नाही त्यामुळे त्या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. सरकारला अशी विनंती आहे की यामध्ये लक्ष घालून, त्यांना लवकरात लवकर मदत करावी नाहीतर त्यांचे कुटुंब उपासमारीने मरेल.

ऑल इंडिया नेटवर्क से क्स वर्कर संघटना अमित कुमार यांनी सांगितले, की जेव्हा कोरोनाची लाट देशात सुरू झाली,  तेव्हा जी. बी रोड दिल्ली येथे राहणारे सुमारे ६० टक्के से क्स वर्कर्स त्यांच्या घरी गेले होते. पण आता तेथे फक्त ४० टक्के महिला शिल्लक आहेत. ज्यांची मालकीण त्यांच्या जेवणाची व्यवस्था करीत आहे, परंतु भाड्यात कोणतीही सूट दिली गेली नाही. सध्या या महिला अडचणीत असून, दुप्पट किंमतीवर आपले काम व्याजासकट चालवित आहेत.

जरी लॉकडाउन उठले, तरी देखील त्यांची परिस्थिती परत पूर्वपदावर येण्यासाठी जवळजवळ ६ महिन्याचा कालावधी लागेल असा अंदाज अमित कुमार यांनी वर्तविला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे, की सर्व काही सामान्य झाल्यानंतरही त्यांचे भाडे, रेशन आणि स्थलांतरची समस्या ही आहे तशी कायमच राहील. ज्या महिला कोरोनाच्या भीतीमुळे मूळ घरी गेल्या आहेत त्या परत येणार नाहीत. जे येथे राहतात त्यांना लवकर ग्राहक मिळणार नाही, कारण कोरोंनाची भीती लोकांमध्ये रहाणार आहे. लॉकडाऊनमुळे त्यांची परिस्थिति खूपच बिकट झाली आहे आणि त्यासाठी काही उपाय नाही.