वयाच्या पन्नाशीनंतरही हि सुंदर अभिनेत्री आजही देते आहे सुप्रसिद्ध अभिनेत्रींना टक्कर, फोटो बघितल्यावर बघतच राहणार तुम्ही ..

Entertenment

सलमान खानसोबत बॉलीवूडमध्ये आतापर्यंत खूप अभिनेत्रींनी काम केले आहे हे तुम्ही पाहिलेच आहे. तसेच सलमान खानबरोबर काही अभिनेत्रींची नावे देखील जोडली गेली आहेत, ज्यांची कारकीर्द सलमानमुळेच उजळून निघाली आहे.

होय, सलमान खानबरोबर ज्यांनी काम केले त्यांचे भाग्य उज्वल झाले. परंतु आम्ही आज ज्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, त्यात सलमान खान नाही तर सलमान खानसाठी तीच अभिनेत्री भाग्यवान असल्याचे सिद्ध झाले आहे.

९०च्या दशकात जेव्हा सलमान खान याने या बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हा कोणालाही त्याचे चित्रपट पाहाण्याची इच्छा नव्हती. परंतु त्याकाळात या एका अभिनेत्रीबरोबर काम केल्यामुळे सलमानचे नशीब उजळले, पण ती अभिनेत्री मात्र आता या क्षेत्रापासून खूप दूर गेली आहे.

असे अजिबात नाही की ती सुंदर नाही तर आजही ती अनेक सुंदर अभिनेत्रींवर मात करू शकते. आम्ही बोलत आहोत सलमानची अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनबद्दल. होय, भाग्यश्रीच ठरली सलमान खानच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टर्निंग पॉईंट.

आज भाग्यश्री बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर गेली असली, तरी एकेकाळी तिने खूप प्रसिद्धी मिळविली आहे. तिच्या सौंदर्याने अजूनही ती लोकांच्या हृदयावर राज्य करते आहे. तिचे अजूनही सोशल मीडियावर बरेच फॅन फॉलोइंग आहे.

आता भाग्यश्रीने वयाची ४९ वर्षे पूर्ण केलेली आहेत, परंतु तिचे सौंदर्य अजिबात कमी झालेले नाही. “मैने प्यार किया” या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी भाग्यश्री पहिल्या चित्रपटाने चांगलीच प्रसिद्ध झाली. पण नंतर मात्र ती बर्याबच कालावधीसाठी प्रसिद्धीपासून दूर होती.

यानंतर २००३ मध्ये पुन्हा एकदा तिने चित्रपटांमध्ये येण्याचा निर्णय घेतला, पण पुन्हा एकदा तिला नशिबाने साथ दिली नाही त्यामुळे आज ती सामान्य जीवन जगत आहे. लग्न झाल्यानंतर भाग्यश्री बॉलीवूड इंडस्ट्रीपासून दूर राहू लागली. पण त्यामुळे तिच्या हातून संधी निघून गेल्या.

आत्ताच भाग्यश्रीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे आपण असे म्हणू शकतो, की आजही ती खूपच आकर्षक दिसत आहे. ४९ वर्षांची असूनही ती तितकीच सुंदर दिसते आहे. तिला दोन मुले देखील आहेत, जी तिच्यासारखीच सुंदर दिसतात.

भाग्यश्रीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तिच्या २३ वर्षांच्या मुलाचे नाव आहे अभिमन्यू आणि मुलगी २१ वर्षांची आहे जिचे नाव आहे अवंतिका, जी दिसायला खूप सुंदर आहे. भाग्यश्रीप्रमाणेच अवंतिकाला चित्रपटांमध्ये आपले करिअर करायचे आहे.

पण अजून तिने यासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही व मार्ग निवडलेला नाही. भाग्यश्री आपले स्वप्न आपल्या मुलीच्या डोळ्यात पाहते. आजकाल भाग्यश्री आपले आयुष्य मोकळेपणी जगताना दिसत आहे. भाग्यश्रीला फिरणे खूप आवडते आणि ती कायमच तिचे नवनवीन फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत असते, ज्याला तिच्या चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो.