दैनंदिन जीवन जगत असताना कधी कोणत्या प्रकारचा त्रास आणि अडचणी भोगाव्या लागतील याची शाश्वती कोणालाही देता येत नाही. अशातच जर आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला गमावून बसलो तर त्याच दुख: अगदी न भरून निघणार ठरतं. मुळात जो जवळचा व्यक्ती गेला त्याचा सहवास लाभणार नाही, त्याच्यामुळे होणारं संरक्षण लाभणार नाही.
त्याच्यामुळे ठामपणे जगू लागणारं आयुष्य फार रिकाम भासू लागेल, अशा विचारांनी कल्पनाही करवत नाही असं एक भकास चित्र वाट्याला येतं. त्यातचं मुळी जर एखाद्या स्त्रीने तिचा नवरा गमावला तर एकप्रकारे तिने तिचं अर्ध सर्वस्व गमावल्याप्रमाणे होऊन बसतं. कोणाच्याही आयुष्यात येऊ नये असा हा भकास आणि वेदनांनी भरलेला ह्रदयद्रावक क्षण असतो.
महिलेच्या विचारांनी पाहिलं तर नवरा एक ग्वाही असतो या समाजात उठणाऱ्या हजारो वाईट प्रवृत्तींच्या नजरा तिच्यावर खिळण्यापासून त्याने तिचं संरक्षण होत असतं. आणि तोच जेव्हा जातो तेव्हा कधी कुठून वासनेचा लवलेश उठेल नी त्या स्त्रीकडे जवळ जायला धजावेल याची शाश्वती देता येत नाही.
घाणेरड्या विचारांनी बर्बटलेली माणसं तुमच्या आजूबाजूला राहतं असतात परंतु एखाद्या खमक्या आधारामुळे त्यांनी तुमच्यासोबत आजवर चांगलच वर्तण केलेलं असतं. परंतु ही अशा प्रवृत्तींची माणसं ही केवळ एखाद्या संधीची वाट पाहत बसलेली असतात.
आम्ही तुम्हाला हे सर्व याकरता इथे सांगत आहोत कारण एका महिलेसोबत असचं काहीस घडल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. मुळात या महिलेच्या बाबतीत गोष्ट अशी घडली की तिचा नवरा मृत्यूमुखी पावल्यानंतर महिनादेखील झाला नसेल तोवरच तिच्यासोबत छेडखानीचे स्वप्न एक माणूस रंगवू लागला आणि त्याचं तिला त्रास देणं सुरू झालं.
तर मंडळी आपण एकूणच ही सविस्तर घटना आता जाणून घेऊयात की नेमकं काय घडलं? सोशल मीडियावर एका महिलेनं तिच्यासोबत घडू लागलेला हा अमानुष प्रकारचा अत्याचार शेअर केल्याच पहायला मिळालं आहे. या महिलेनं शेअर केलेल्या या प्रकाराने अनेकजण फारच याबाबत जागृत झाले आहेत व इतरांनामधेही ते याबाबत होईल तो सावधानतेचा इशारा पसरवताना दिसत आहे. सावधानता याकरता कारण कोणतीही महिला जिथे काम करते.
तिच्या आजूबाजूचा इतर परिसर असेल वा जे काही तिला कधी कुठून पुरूषाच्या वासनी नजरेचा सामना करावयाची वेळ येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे तिने स्वत:ला ठिक सुरक्षित ठेवण्याचे धडे आत्मसातही केले पाहिजेत. तर या महिलेच्या पतीच्या निधनाला एक महिना पुर्ण झाला नव्हता तोवर तिच्या ऑफिसमधील सहकाऱ्याने तिला मेसेजेस पाठवायला सुरूवात केली. सुरुवातीला त्याने अगदी विचारपूस करत तिला काळजी दाखवली.
मग दुख:ही व्यक्त केलं परंतु त्यापुढे तो जे बोलू लागला त्याने त्या महिलेला धक्काच बसला. तुझा नवरा चांगला होता. त्याचा उल्लेख करून देत पुढे या सहकाऱ्याने तिला त्याच्यासोबत डेटवर येण्याची गंभीर बाबही बोलून दाखवली. जेव्हा या महिलेने त्याला नकार दिला तेव्हा त्याची बोलण्याची पद्धत आणखीच खालच्या थराला गेली. तो म्हणू लागला, तुझ्या नवऱ्याला तू माझ्यासोबत आल्यावर आनंद झाला असता.
त्याची कायम अशीच इच्छा असायची. मेलेल्या व्यक्तीचा आधार घेत हा माणूस धडधडीत खोट आणि वाट्टेल ते बोलू लागल्याने महिलेला फार त्रास सहण करावा लागला. या महिलेने नुकतीच ही चॅटींग सोशल मीडियावर लीकही केली आहे. ती म्हणते काही लोक हे कचऱ्यापेक्षाही खालच्या पातळीचे असतात. तिच्या पोस्तनंतर इतर काही महिलांनी त्यांच्यासोबत घडलेले काही अशेच वाईट किस्से शेअर केल्याचे पहायला मिळतं आहेत.
मित्रांनो तुम्हीच सांगा या महिलेने वेळीच त्या सहकाऱ्याला ब्लॉक करत त्याला इतर स्टाफसमोर चपराक द्यायला हवी होती का? अशा वाईट प्रवृत्तींच्या लोकांच्या विचारांना आळा बसण्यासाठी काही विशेष शिक्षा आमलात आणल्या पाहिजेत का? स्त्रिचा नवरा मेला अर्थात ती एकटी अबला राहिली हा विचार किती चुकीचा आणि घृणास्पद आहे? आपली उत्तरं आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. धन्यवाद!