लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे 43 वर्षाची माही गिल,अडीच वर्षाच्या मुलीची आहे आई,केला धक्कादायक करणारा खुलासा…

Bollywood Entertenment

माही गिल बॉलिवूडची सर्वात बो-ल्ड आणि सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. माही गिल चित्रपटांद्वारे बॉलिवूडमध्ये विशेष काही करू शकले नाही. पण माही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरीच चर्चेत राहिली आहे. खर तर माहीला तिचे वैयक्तिक आयुष्य गुप्त ठेवणे आवडते.

पण मागच्याच एका मुलाखती मध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. 43 वर्षीय माही म्हणते की ती लिव्ह-इनमध्ये राहत असून तिला अडीच वर्षाची मुलगीही आहे.

माही गोव्याच्या एका बिजनेसमैनला डेट करत आहे:- चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंट दरम्यान माही सध्या त्याच्या आगामी फॅमिली ऑफ ठाकुरगंज चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आहे माहीने सांगितले की तिचा एक बॉयफ्रेंड आहे. माहीने सांगितले की तिचा बॉयफ्रेंड गोव्याचा एक बिजनेसमैन आहे. आमच्या दोघांनाही लग्न करायचं आहे. पण दोघांवर लग्नाचा दबाव नाही. अशा परिस्थितीत आम्ही दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत आहोत.

माहीने हा खुलासा केला:- माहीने सांगितले की मी आणि माझा बॉयफ्रेंड दोघांनाही स्वातंत्र्य आवश्यक आहे. आम्ही दोघेही एकमेकांच्या विचारांचा आदर करतो आणि एकमेकांना स्वताची स्पेस देतो. आम्ही दोघे एकमेकांना खूप प्रेम आणि आदर देतो. नातेसं-बंधात दोन लोकांमध्ये प्रेम आणि आदर असणे फार महत्वाचे आहे. याक्षणी आम्ही दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत आहोत. पण लवकरच आम्ही लग्न करणार आहोत.

माही ला अडीच वर्षाची मुलगी देखील आहे:-  माहीने  पुढे सांगितले की तिला अडीच वर्षाची मुलगी आहे. माही बर्‍याचदा तिच्या कामात व्यस्त असते. अशा परिस्थितीत माही ची काकू तिच्या मुलीची काळजी घेत असते. माही ही दबंग साहेब बीवी और गॅंगस्टर साहेब बीवी और गँगस्टर 2 देव डी आणि गुलाल यासारख्या चित्रपटामध्ये तिने काम केले आहे.

माही गिलने आता पर्यंत अनेक बोल्ड भूमिका साकारल्यामुळे आज तिच्याकडे एक बोल्ड अभिनेत्री म्हणून पाहिले जाते. परंतु नेहमी बोल्ड भूमिका साकारणे कंटाळवाणे असते असा खुलासा माहीने मुलाखतीत केला आहे.

माही लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर म्हणजे वेब सिरीज मध्ये काम करणार आहे. ती झी5 वरील पोशम पा या चित्रपटात वे-श्या महिलेची भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीदरम्यान माहीला या भूमिकेबद्दल विचारण्यात आले होते.

एक अभिनेत्री म्हणून मला विविध भूमिका साकारायला आवडतात आणि कोणत्याही भूमिकेसाठी मी नकार देत नाही. पण मला नेहमी एकाच प्रकारच्या भूमिकेच्या ऑफर मिळतात. लोकांना नेहमी एखादी बो-ल्ड आणि मा-दक अभिनेत्री कास्ट करायची असते तेव्हा ते मला फोन करतात असे माही ने सांगितले.

खरं सांगायचे झाले तर बो-ल्ड भूमिका साकारणे कंटाळवाणे आहे. हळूहळू मी वेगळ्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली आहे असे माही पुढे म्हणाली. माही गिलनेही सर्व माध्यमांसमोर कबूल केले आहे की तिचे अद्याप लग्न झाले नाही आणि ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत लिव्ह-इनमध्ये आहे.

माही गिल आपल्या मुलीबद्दल म्हणाली मी अभिमानाने सांगू शकते की मी एका मुलीची आई आहे. जरी मी अद्याप लग्न केलेले नाही.जेव्हा  मला पाहिजे तेव्हा लग्न करेन यावर्षी ऑगस्टमध्ये माझी मुलगी तीन वर्षांची होईल.