बॉलीवूड सेलिब्रिटींना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. त्यांच्या यादीतील नावे अनेक आहेत, पण आता त्यातील नवीन नाव समोर आले आहे, ते म्हणजे कपिल शर्माची पत्नी गिन्नी चतरथ. मुंबईत बागी 3 या चित्रपटाचे प्रदर्शन होते व त्यासाठी गिन्नी तिथे गेली होती. गिन्नीचे त्यावेळचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यात असे दिसून आले, की गिन्नीचे वजन आधीच वाढलेले आहे.
गिन्नीच्या पहिल्या मुलाचा जन्म डिसेंबरमध्ये झाला आहे आणि गरोदरपणात स्त्रियांचे वजन वाढतेच हे आपल्याला माहीतच आहे, परंतु ट्रोलर्सना ह्याची कुठे माहिती असते. त्यांनी तिच्या वजनावरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
ट्रोलर्सनी केल्या अश्लील कॉमेंट्स- गिन्नीच्या टाकलेल्या फोटोजवर ट्रोलर्सनी इन्स्टाग्रामवर अश्लील अशा कमेंट्स लिहिल्या. त्यांच्या कॉमेंट्स होत्या “हाथी मेरे जीवन साथी” “कपिल के नसीब में यही है क्या” एका ट्रोलरने लिहिले “दोनों मियां बीवी किस चक्की का आटा खाते हैं” एका युजरने लिहिले की “इतनी मोटी-ये तो बच्चा यादव की बहन लगती है.”
कपिलच्या चाहत्यांनी मात्र याला विरोध केला व ते गिन्नीच्या बचावासाठी आले. त्यांनी ट्रॉल्सही ट्रोल केले. त्यातील एका युजरने लिहिले” त्यांना लाज वाटली पाहिजे, जे कपिलच्या पत्नीला जाडी म्हणत आहेत”. ते म्हणतात, जर ती थोड्या दिवसांपूर्वी एका मुलाची आई झाली आहे तर तिचे वजन वाढणे स्वाभाविक आहे. तुम्ही असे काहीही बोलू शकत नाही. तुमची आई, बहीण किंवा कोणी नातेवाईक जाड नसतात का? अशा कॉमेंट्स करताना लाज वाटली पाहिजे.
गिन्नी १० डिसेंबरला आई झाली होती:- लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या फक्त दोन दिवस आधी कपिल शर्मा वडील झाला. १० डिसेंबरला कपिलची पत्नी गिन्नी यांना मुलगी झाली. कपिलने ही आनंदाची बातमी ट्विटरवरुन सांगितली. त्यांनी पहाटे 3 वाजता आपल्या ट्विटमध्ये मुलगी झाल्याचे नमूद केले, व या आनंदाच्या प्रसंगी आशिर्वाद द्या असे लिहिले. सगळ्यांवर माझे प्रेम आहे व देवीचे नाव “जय माता दी” असे कपिलने ट्विटर वर लिहिले.
कपिल शर्मा हा कॉमेडी मधील राजा आहे, व त्याची गर्लफ्रेण्ड गिन्नी चतरथ यांच्या वडिलांनी प्रथम त्यांच्या लग्नाला “कपिल शर्माला शटअप” असे म्हणून नकार दिला होता. तिच्या वडिलांनी जारी कपिलचा अपमान केला तरी कपिल शर्मा यांनी गिन्नी चतरथ हिच्यासोबत विवाह केला. लग्नात दोन्हीकडील नातलग म्हणजेच कपिल आणि गिन्नीच्या कुटुंबीयांसह मित्रमंडळी उपस्थित होती.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात ‘मिट माय वाईफ’ अशी पोस्ट टाकून कपिलने गिन्नीसोबतचे आपले नाते जगजाहिर केले होते. गिन्नी चतरथ हिच्या वडिलांनी अपमान केल्यानंतर कपिल आणि गिन्नीच्या ब्रेकअपची बातमीही समोर आली होती. पण ती फक्त अफवा असल्याचे सिद्ध झाले होते. गेल्या वर्षभरात कपिलच्या वैयक्तिक आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली.
तो वादाच्या भोवर्यामत सापडला. “कॉमेडी नाईट्स विथ कपिल” यामधील त्याचा सहकलाकार सुनील ग्रोवरशी त्याचे खटके उडाल्याने कपिल वादाच्या भोवऱ्यात अडकला. त्या कालावधीत कपिलने अनेक वेळा अगदी नाईलाज म्हणून शेवटच्या क्षणी शूटिंग रद्द केली होती. त्यामुळे अजय देवगण, शाहरुख खान, इम्रान हाश्मी यासारख्या प्रसिद्ध व मोठ्या कलाकारांना ताटकळत राहावे लागले होते. त्यानंतर मात्र या “द कपिल शर्मा शो” ला ही समाप्त करण्यात आले.
या दरम्यान कपिलची प्रकृती ढासळली त्यामुळे “फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा” हा नवा शोसुद्धा फक्त तीन एपिसोडमध्ये संपवावा लागला. कपिल त्यावेळी डिप्रेशन व्यसन आदींमध्ये अडकला. पण नंतर तो सगळ्यांतून बाहेर पडला आणि गिन्नीशी विवाहबद्ध झाला.
मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर कॉमेडियन कपिल शर्माने आपल्या लाडक्या लेकीचे फोटो सोशल मीडिया अकाउंट्सवर लोकांबरोबर शेअर केले. या फोटोंमध्ये तो आपली पत्नी गिन्नी चतरथ आणि लेकीसह दिसत आहे. त्यांच्या पोस्टमध्ये कपिलने लिहिले आहे – भेटा अनायरा शर्मा हिला- माझ्या काळजाचा तुकडा.
त्याच्या पहिल्या फोटोत तो व त्याची पत्नी गिन्नी आपल्या लाडक्या लेकीला न्याहाळताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत अनायरा एखाद्या बहुलीप्रमाणे अतिशय क्यूट दिसत आहे. या कपिलच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी तसेच त्याच्या चाहत्यांनी मुलीला भरभरून आशिर्वाद दिले आहेत.
या आधीही अनायराची छायाचित्रे इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या अकाऊंटमधून व्हायरल झाली होती. पण ते फोटोज स्पष्टपणे दिसत नव्हते, त्यामुळे ते कपिल शर्माच्या मुलीचे आहेत, याबद्दल पक्की माहिती कोणालाच नव्हती.