सैफ अली खानला बॉलिवूडमध्ये छोटा नवाब म्हणून ओळखले जाते. आपल्या सर्वांना माहितच आहे की सैफने अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केले होते. त्याने हे लग्न सर्वात गुपचूप पद्धतीने केले होते. या लग्नामुळे घरातील माणसेही खूप नाराज होती कारण अमृता सैफपेक्षा बरीच मोठी होती. पण हळूहळू प्रकरण मिटले आणि त्यांनी एक आनंदी आयुष्य जगण्यास सुरुवात केली.
हिंदू कुटुंबातून आलेल्या अमृताने सैफशी लग्न करण्यासाठी इस्लाम ध-र्म स्वीकारला होता. सैफ आणि अमृता यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुले आहेत. मात्र आता या दोघांचाही घटस्फो-ट झाला असून सैफने 16 ऑक्टोबर 2012 रोजी करीना कपूरशी लग्न केले होते. आज या दोघांचा एक गोंडस मुलगा तैमूर अली खान आहे. आज करीना आणि सैफचे लग्न होऊन ८ वर्ष झाली आहेत.
या चित्रपटाच्या शू-टिंगदरम्यान दोघांमध्ये प्रेम झाले:- सैफ आणि करीनाचे लग्नही चर्चेत होते कारण करीना तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होती. लग्नाला ८ वर्ष झाली तरी या जोडप्यातील प्रेम पूर्वीसारखेच आहे आणि प्रेमापुढे वयाचा काही फरक पडत नाही हे त्यांनी सिद्ध केले.
टशन हा चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. यादरम्यान करीना आणि सैफ एकमेकांच्या प्रेमात पडले. जरी हा चित्रपट एक फ्लॉप चित्रपट होता परंतु खरे प्रेम मिळविण्यात दोघांनाही नक्कीच यश आले. त्या काळात दोघांच्या प्रेमाबद्दल बर्यापैकी अफवा पसरली होती पण जेव्हा सेफने करीनाचे नाव त्याच्या हातावर टॅटू केले तेव्हा याची पुष्टी झाली. त्यानंतर दोघांचे नाते खूप मजबूत झाले होते.
लग्नाआधीच करीनाने ही अट ठेवली होती:- लग्नाआधी असो किंवा लग्ना नंतर या जोडप्याने त्यांचे प्रेम कधीही लपवले नाही. दोघांनाही बर्याचदा कोणत्याही कार्यक्रमात हातात हाथ घालून फिरताना पाहिले जाते. करिनाने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की लग्नाआधी तिने सैफसमोर एक अट ठेवली होती.
स्वत: करीनाने असे म्हटले आहे की सैफशी लग्न करण्यापूर्वी तिने एक अट घातली होती की मी तुमची पत्नी आहे आणि पण मी चित्रपट करयाचे थांबवणार नाही आपण दोघे पैसे कमवू आणि आयुष्यभर तू मला साथ देशील. या अटीवर सैफ अली खान सहमत झाला आणि दोघांनी रॉयल स्टाईलमध्ये लग्न केले.
लग्नाच्या 4 वर्षानंतर करिनाने मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तैमूरला जन्म दिला. जन्मापासूनच तैमूर सर्वांच्या पसंतीस उतरला आणि करीना आणि सैफच्या आयुष्यात मोठा बदल झाला.
आजच्या तारखेमध्ये लोकांना तैमूरला करीना आणि सैफपेक्षा जास्त बघायचे असते. तैमूरची क्यूट फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. करीना आई होत असतानाही काम करत राहिली. आणि आजही ती चित्रपट करत आहे.
सध्या लॉकडाउनचा काळ असल्यामुळे शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र या काळतही काही वेळा सैफ आणि करीना घरातून बाहेर पडताना पाहायला मिळाले. यावरुन अनेकांनी त्यांना ट्रोलदेखील केलं. मात्र सैफने घराबाहेर पडण्याचं कारण सांगितले आहे.