Breaking News

रागिणी एम.एम.एस-२ मध्ये दिसली होती रेखाच्या पतिची मुलगी, त्यानंतर करू लागली असे काम जे बघून धक्का बसेल …

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील असे अनेक अभिनेते आहेत जे त्यांच्या चाहत्यांच्या मनावर आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले आहेत. अनेक कलाकारांची सिनेमातील कारकीर्द फार मोठी नसली तरी त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत काही कमतरता आलेली नाही. याच अभिनेत्यांपैकी एक नाव आहे ते म्हणजे विनोद मेहरा.

१३ फेब्रुवारी १९४५ मध्ये अभिनेता विनोद मेहरा यांचा जन्म झाला. “रागिणी” या सिनेमातून त्यांनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीमध्ये आपले पदार्पण केले. या सिनेमात त्यांनी किशोर कुमार यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

रेखाचे प्रथम लग्न झाले होते विनोद मेहरा यांच्याशी – तुमच्या माहितीसाठी सांगतो वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी विनोद मेहरा यांनी या जगाला कायमचा निरोप दिला होता. मीडिया रिपोर्टनुसार रेखाचे पहिले पती विनोद मेहरा हेच होते. विनोद मेहरा आणि रेखाची “घर” चित्रपटाच्या सेटवर भेट झाली होती.

चित्रीकरणाच्या दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी गुपचुप पद्धतीने लग्न केले. परंतु विनोद मेहरांच्या आईला हे लग्न मान्य नव्हते. यामुळे लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विनोद मेहरा हे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सगळ्यात उमदे व देखणे अभिनेता होते.

विनोद मेहरांची मुलगी खूप ग्लॅमरस आहे:- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनियानंसुद्धा अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. रुपेरी पडद्याबरोबरच छोट्या पडद्यावरही सोनियाने आपली जादू दाखवली. रुपेरी पडद्यावर सोनियाने केलेला शेवचा चित्रपट म्हणजे २०१४ साली आलेला रागिणी एम.एम॰एस-२ हा होता.

या सिनेमात तिने तान्या कपूर ही भूमिका साकारली होती. याशिवाय एमटीव्हीवरील विविध कार्यक्रमांमध्येसुद्धा ती झळकली आहे. एमटीव्ही ग्राइंड, एमटीव्ही न्यूज आणि एमटीव्ही स्टाइल चेक अशा शोमध्ये व्हीजे म्हणून तिने काम केले आहे.

सोनियाची स्टाइल आणि अदा कुणालाही घायाळ करतील अशाच म्हणाव्या लागतील. तिचा बोल्ड आणि मादक अंदाज यासाठी रसिक वेडे आहेत. सोनिया सोशल मीडियावर खूप एक्टीव्ह असते. नेहमी तिचे नवनवीन फोटो शेअर झाले की सोशल मीडियावरील अशाच हॉट आणि मादक फोटोंची खुमासदार चर्चा रंगते. या प्रत्येक फोटोमध्ये तिचा खास आणि वेगळा अंदाज पाहायला मिळतो.

अनेक स्टार किड्स बरोबर ती सौंदर्यात स्पर्धा करते:- आजकाल स्टार किड्सचे युग सुरू आहे आणि सुहाना खान, सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे हे सर्व परिचित आहेत तर सोनिया मेहराला फारच थोडे लोक ओळखतात. पण सौंदर्याच्या बाबतीत सोनिया या सर्व स्टार किड्सच्या पुढे आहे.

आजच्या या लेखामध्ये आम्ही सोनिया मेहराचे काही सुंदर फोटोज दाखवत आहोत. आम्हाला खात्री आहे की सोनियाचे हे फोटोज बघून तुम्हीही तिच्या सौंदर्याचे वेडे व्हाल. २९ वर्षे वय असलेली सोनिया एका परीसारखीच सुंदर दिसते. रागिणी एमएमएस 2 शिवाय तिने “एक मैं और एक तू” “छाया” आणि “व्हिक्टोरिया नंबर 13” सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सोनिया मेहराच्या आताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती आज एक योग प्रशिक्षक बनून नाव कमावते आहे. एका मुलाखतीत तिने कार्यक्रम, चित्रपट वगैरे सोडून आयुष्यात मोठे निर्णय घेण्याबद्दल सांगितले.

तिच्या मते चित्रपट इंडस्ट्रीमध्ये टिकून रहाण्यासाठी सगळेच लोक स्वप्न पाहत असतात ज्यांच्या मोठ्या महत्वाकांक्षा असतात. विनोद मेहरा यांची मुलगी सोनिया पुढे म्हणाली की तिच्या मनात चित्रपटांबद्दलही खूप मोठी स्वप्ने होती आणि तिने इंडस्ट्रीमध्येही थोडे काम देखील केले होते.

यासाठी तिला आनंद आहे की तिला काही चित्रपटामध्ये काम करण्याची संधीही मिळाली. जेव्हा बॉलिवूडमध्ये तिला काय शिकायला मिळते असा प्रश्न विचारला तेव्हा तिने उत्तर दिले की आपण जे काही करू इच्छिता, त्यामध्ये आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणे खूपच महत्वाचे आहे.

 

About Team LiveMarathi

Check Also

Three big decisions of Modi government which affected the Indian economy

Like previous two years, in the last year too Prime Minister Narendra Modi managed to …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *