भारतीय सिनेमाक्षेत्रात ड्रामा क्वीन या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे अर्थातचं राखी सावंत. तिला हे असं नाव पडण्यामागच खास कारण वेगळं सांगायला नको कारण ती जे काही करते त्या गोष्टींना फार विचित्र आणि भलतचं रूप असतं. तर या ड्रामा क्वीनने मागेच काही दिवसांपूर्वी लग्न करून खुप साऱ्या चर्चांना उधाण आणलं होतं परंतु आता मात्र तिच्या लग्नाच्या आनंदावर पाणी पडण्याची वेळ जणू आली आहे.
रितेश नावाच्या एका व्यक्तीसोबत तिने आपलं लग्न झाल्याचा खुलासा केला होता. यासोबतच तो व्यापारी असल्याचीही माहिती दिली होती. या बातमीने राखी सावंत हिच्या नवऱ्याला प्रत्यक्ष पहायला सर्वच जनता उत्सुक झालेली पहायला मिळाली होती. सध्याच्या घडीला सुरू असलेल्या बिग बॉसच्या 15 व्या सिझनमधे राखी सावंत हिचादेखील सहभाग आहे.
राखीने याच कार्यक्रमात आपल्या पतीसोबत चक्क तिची एन्ट्री केल्याने सारेच आश्चर्यचकित झाल्याचे पहायला मिळाले होते. त्या कार्यक्रमात असलेल्यांना रितेश हा तिचा नवरा आहे ही बाब काहीशी खरी वाटलीच नाही, बॉलीवुडचा दबंग सलमान खान यानेही अशी शंका थेट बोलून दाखवली होती.
यादरम्यानचं नेमका एक मोठा धक्कादायक खुलासा झाला ज्याने सर्वांनाच अचानक धक्का दिला. राखी सावंत हिच्या पतीबाबतच्या या नव्या बातमीने इंटरनेटवर बरीच चर्चा झाल्याची पहायला मिळाली आहे. राखीच्या या नवरा म्हणवल्या जाणाऱ्या रितेशने एक फारच मोठा खुलासा केला.
या रितेशकडून इंटरनेटवर आपल्या बायको व मुलांचे फोटो शेअर झाल्याचे पहायला मिळाले. आणि या घटनेनंतर रितेशची पहीली पत्नी म्हणाली की, तिचा व रितेश या दोघांचा जर घटस्फोट झालाच नाही तर त्याचं आणि राखीचं लग्न कसं काय होऊ शकतं? या अशा प्रकारच्या घटनेने अनेकांना पुन्हा राखीवर संशंय येत असल्याचं पहायला मिळतं आहे.
रितेशच्या पहिल्या पत्नीचं नाव स्निग्धा हे असं आहे. राखीच्या म्हणण्यानुसार तिचा नवरा रितेश हा बेल्जियम येथून आलेला एनआरआय अर्थात थोडक्यात बाहेरच्या देशातला भारतीय व्यक्ती आहे. परंतु हा दावाही रितेशची मुळ पत्नी स्निग्धा हीने फेटाळून लावला आहे. 2014 सालात बिहार येथील रहिवासी असलेल्या रितेशसोबत स्निग्धा चं लग्न पार पडलं.
लग्न अरेंज मॅरेज झालं. त्यानंतर दोघेही चेन्नई इथे स्थलांतरित झाले होते. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांना एक मुलगाही झाला होता. रितेशबद्दल बोलणारी स्निग्धा पुढे हेदेखील म्हणाली की, रितेश एक रागीट स्वभावाचा हेकेखोर माणूस आहे. अनेकदा त्याने तिला मारहाण केली आहे. त्यानंतर रागात तिने त्याच्यापासून वेगळं राहणं पसंत केलं आणि ती आई वडीलांकडे राहू लागली. परंतु तिचा घटस्फोट अद्यापही झालेला नाही.
त्यानंतर रितेश त्याचं घर सोडूनही निघून गेला आणि नंतर थेट दिसला तो बिग बॉसच्या या कार्यक्रमात तेदेखील एका अभिनेत्रीचा नवरा म्हणून. या सर्व घटनेनंतर आता अभिनेत्री राखीला फारच धक्का बसल्याच चित्र पहायला मिळतं आहे. ती म्हणते आहे की, रितेश तर फारच वाईट आणि धोका देणारा माणूस निघाला.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!