मिका सिंग (Mika Singh) हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध गायक म्हणून ओळखला जातो. ‘मोज्जा ही मोज्जा’ या गाण्यामुळं लोकप्रिय झालेल्या मिकानं आपल्या अनोख्या आवाजाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान प्रस्थापित केले आहे. सुप्रसिद्ध गायक मिका सिंगच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. त्याने आजवर सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली. मिका सिंग गाणी अगदी थिरकायला लावणारी असतात. आपल्या कामामुळे मिका सतत चर्चेत असतो.
मिकाचं खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. राखी सावंतबरोबर त्याचा झालेला वा’द तर जग जाहिर आहे. पण सध्या चर्चा रंगत आहेत ती त्याच्या लग्नाची. प्रसिद्ध गायक मिका सिंग अखेर लग्नबं’धनात अडकण्यासाठी सज्ज झाला आहे. जवळपास 100-150 मुलींची स्थळं नाकारल्यानंतर मिका सिंगला त्याची जीवनसाथी सापडली आहे. त्याने 12-15 स्पर्धकांच्या यादीतून टॉप 3 मुलींची निवड केली आहे.
बॉलिवूडचा दिग्गज गायक मिका सिंगला अखेर ‘जोडीदार’ मिळाला. ‘स्वयंवर: मिका दी वोहती’ या सर्व स्पर्धकांना सोडून त्याने आपली सर्वात जुनी मैत्रिण आकांक्षा पुरी हिला आपली जीवनसाथी म्हणून निवडले आहे.
अलीकडेच, तिने मिका सिंगसोबत तिच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच ती म्हणाली की, ती खूप दिवसांपासून रो’मान्ससाठी आसुसली होती. मात्र, आता त्याला अखेर प्रेम मिळाल्याने तो खूश आहे. यापूर्वीही आकांक्षा पुरी आणि मिका सिंग यांच्यात डेटिंग असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. अशा परिस्थितीत आकांक्षाने मिका दी वोहतीची एन्ट्री करणे सर्वांसाठीच आश्चर्यकारक होते. यामुळे आकांक्षाही खूप ट्रो’ल झाली होती.
मिका सिंगची दुल्हनिया निवडण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अशा परिस्थितीत शोच्या विजेत्याच्या घोषणेने काही लोक आनंदी आहेत, तर काहींची निराशाही झाली आहे. चाहत्यांना मिकाचे लग्न नॅशनल टीव्हीवर बघायचे होते. पण गायकाने लग्न न करून चाहत्यांची निराशा केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणावरही ठोस शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. फोटोंमध्ये मिका खूप सुंदर दिसत आहे.
दुसरीकडे, आकांक्षा पुरी गुलाबी रंगाच्या ब्राइडल लेहेंग्यात खूपच क्यूट दिसत आहे. मिकाच्या नावाच्या हातात मेहंदी, चुडा या अभिनेत्रीच्या लूकमध्ये भर घालत आहेत. दोघांनीही गळ्यात गुलाबी फुलांच्या माळा घातल्या आहेत. एका फोटोमध्ये मिका आकांक्षाच्या हाताला किस करताना दिसत आहे. दरम्यान, अलीकडेच ‘स्वयंवर: मिका दी वोटी’च्या सेटवरून काही छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यामध्ये मिका सिंग आणि आकांक्षा पुरी रो’मँटिक अंदाजात दिसत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिकाने शोमध्ये स्टेजवर लग्न केलेले नाही. फक्त तिची निवड दाखवण्यासाठी त्याने आकांक्षाच्या गळ्यात माळ घातली आहे. त्यानंतर गायकाने सांगितले की, गाठ बांधण्यापूर्वी त्याला कॅमेऱ्यांपासून दूर आकांक्षासोबत आपला दर्जेदार वेळ घालवायचा आहे. याशिवाय मिकाने अभिनेत्रीच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आणि नवीन प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेत त्यांचे आशीर्वाद घेतले.
तर आकांक्षासुद्धा अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 2015 मध्ये आलेल्या ‘कॅलेंडर गर्ल’ या चित्रपटात नंदिता मेननची भूमिका साकारून तिने लोकप्रियता मिळवली. ती मूळची मध्य प्रदेशातील इंदूरची आहे. भोलाल इथून तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं. तिचा जन्म 26 जुलै 1988 रोजी झाला. तिने ‘बिग बॉस 13’ फेम पारस छाबराला डेट केलं होतं. पण या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही
दरम्यान, मिकाचं बालपण हे पंजाबमधील रोपर या गावीच गेलं. त्याच्या या गावाशी बऱ्याच आठवणी जोडल्या गेल्या आहेत. हा म्युझिक व्हिडीओ शूट करण्यासाठी जेव्हा मिका लोकेशन शोधत होता तेव्हा हेच गाव त्याच्या डोळ्यासमोर आलं. याआधी राखी सावंत, रतन राजपूत, राहुल महाजन या मंडळींचं छोट्या पडद्यावर स्वयंवर झालं होतं. आता मिकाही याच मंडळींच्या पावलांवर पाऊल ठेवताना दिसत आहे.