Breaking News

माणुसकीचे जगते-जागते उदाहरण आहे हे 10 बॉलीवुड स्टार्स, रस्त्यावरून अनाथ मुलांना उचलून केले असे काही …

बॉलिवूड स्टार्ससुद्धा सामान्य माणसांप्रमाणेच असतात. आपण सामान्य माणूस ज्याप्रमाणे अनाथ मुलांवर प्रेम करतो त्याच प्रकारे या अनाथ मुलांना पाहून या स्टार्सचे मन देखील अ स्वस्थ झाले होते.

पैशांच्या अभावी आणि इतर जबाबदाऱ्यामुळे आपण सामान्य लोक अश्या अनाथ मुलांवर प्रेम दाखवत असतो तर बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या यशाच्या पुरतेच मर्यादित न राहता काही अनाथ मुलांनाही दत्तक घेतले आहे आणि त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन देखील केले आहे.

बॉलिवूड स्टार्सकडे भरपूर पैसे असतात. जर त्यांना वाटले तर ते कोणत्याही अनाथ मुलाचे संगोपन करू शकतात त्यांच्याकडे अजिबात पैशाची कमी नसते. पण प्रत्येकाचे मन इतके मोठे आणि चांगले नसते. असे करणारे काही मोजकेच लोक या जगात आहेत.

आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा 10 बॉलिवूड स्टार्सची ओळख करुन देणार आहोत ज्यांनी अनाथ मुलांना दत्तक घेऊन माणुसकीचा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. या स्टार्सनी या अनाथ मुलांना केवळ दत्तकच घेतले नाही तर आपली स्वताची नावेही त्यांना दिली आहेत. चला आपण बघू की ते असे कोणते स्टार्स आहेत.

१. सुष्मिता सेन:- मिस युनिवर्स आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन हिने रेने आणि अलीशा नावाच्या या दोन मुलींना दत्तक घेतले आहे. सुष्मिता आपल्या दोन मुलींवर खूप प्रेम करते आणि तिने त्या मुलींचे चांगल्या प्रकारे संगोपन केले आहे.

२. मिथुन चक्रवर्ती:- आम्ही आपणास सांगतो की मिथुन चक्रवर्ती यांना 4 मुले आहेत. पण आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांनी आपली मोठी मुलगी ईशानीला रस्त्यावरून उचलुन घरी आणले होते. आज ते आपल्या स्वताच्या मुलीप्रमाणेच तिच्याशी वागतात आणि तीचे संगोपन करत आहेत.

३. रवीना टंडन:- रवीना टंडनने वयाच्या २२ व्या वर्षी दोन मुलींना अनाथ आश्रम मधून दत्तक घेतले होते. पूजा आणि छाया अशी या दत्तक मुलींची नावे आहेत. तिने दोघां मुलींना एक चांगले आयुष्य दिले आहे.

४. सलीम खान:- सलीम खानने मुलगी अर्पिताला दत्तक घेतले आहे. अर्पिता ही सलमानची खरी बहीण नाही असे असूनही खान कुटुंब तिच्यावर खूप जास्त प्रेम करतो तुम्हाला माहिती असेलच खान कुटुंबाने किती थाटामाटात तिचे लग्न लावून दिले होते.

५. निखिल अडवाणी:- निखिल अडवाणी हे बॉलिवूडचे एक प्रसिद्ध डायरेक्टर आहेत. आपणास माहिती आहे का कल हो ना हो आणि एरलिफ्ट सारख्या सुपरहि*ट चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. निखिलची मुलगी काया ही दत्तक घेण्यात आली होती. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी असताना या मुलीला त्यांनी दत्तक घेतले होते.

६. शोबना:- शोभना ही साउथ इंडियन चित्रपटातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मुलगी अनंथारायनीला दत्तक घेऊन तीचे चांगल्यारित्या संगोपन केले आहे.

७. संदीप सोपरकर:- संदीप सोपारकर हे बॉलिवूडचे एक प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर आहेत. त्यांनी 2008 मध्ये अर्जुन नावाच्या मुलाला दत्तक घेतले होते. अर्जुनला दत्तक घेताना ते अविवाहित होते. पण आता त्यांचे जेसी रंधावाशी लग्न झाले आहे.

८. सुभाष घई:- बॉलिवूडचे ९० च्या दशकातले एक प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे सुभाष घई. यांनीही एक मुलीला दत्तक घेतले आहे. यांनी मेघना नावाच्या मुलीला दत्तक घेतले आणि तिला आपल्या मुलीसारखे वाढविले आहे. त्यांनी मेघनाला शिक्षणासाठी लंडनला पाठवले आणि नंतर तिचे लग्न राहुल पुरीशी लावून दिले.

९. दिबाकर बॅनर्जी:- दिबाकर बॅनर्जी बॉलीवूडच्या प्रसिद्ध डायरेक्टरमधले एक आहेत. दिबाकर यांनी खोसला का घोसला यांसारखे अनेक सुपरहि*ट चित्रपट दिले आहेत. आम्ही आपणास सांगतो की दिबाकर आणि त्याची पत्नी रिचा यांनी मुंबईतील एका अनाथ आश्रमातून इरा नावाच्या मुलीला दत्तक घेतले होते.

१०. कुणाल कोहली:- कुणाल कोहली बॉलीवूडचा एक सुप्रसिद्ध प्रोड्युसर आहे. कुणाल आणि त्याची पत्नी रवीना यांनीही राधा नावाच्या एक गोड मुलीला दत्तक घेतले आहे आणि दोघे आनंदाने तीचे पालन पोषण करीत आहेत.

About admin

Check Also

ए’म’ए’मए’स कांडवर रडणारी अंजलीने एका रशियन पुरुषासोबत वेळ घालवण्यासाठी मागितले होते पाच हजार रुपये, जाणून व्हाल थक्क!

सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे,जिथे क्षणाक्षणाला नवीन गोष्टी अपलोड होत असतात. अनेक फोटो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *