मलाइकाने आपल्या प्रेग्नेंसी बद्दल केला मोठा गौप्यस्फोट ,”म्हणाली डिलीवरीच्या 40 दिवसानंतरच”…

Bollywood

अभिनेता अर्जुन कपूर जो की मलायका पेक्षा 12 वर्षांनी लहान आहे त्याच्याबरोबर चालू असलेल्या प्रेम प्रकरणामुळे मलायका अरोरा चर्चेत आहे आणि मागे काही दिवसांपूर्वीच या दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली होती मात्र आता ते लग्न करणार आहेत ही बातमी आहे. अलीकडेच मलायकाने तिच्या स्वप्नातील लग्नाबद्दल तिचा काय विचार आहे याबद्दल सांगितले.

मलायका नेहा धुपियाच्या नो फिल्ट कार्यक्रमात तिने सांगितले की जेव्हा ती पहिल्या वेळी गर्भवती होती त्यावेळी तिनेही काम करणे थांबवले नव्हते आणि ती प्रसूतीनंतर केवळ 40 दिवसात लगेच काम करायला लागली होती. मी गरोदरपणापूर्वी काम केले नंतर गरोदरपणाच्या दिवसांत काम केले आणि प्रसूतीनंतर केवळ 40 दिवसात मी काम करण्यास सुरवात केली. मी माझ्या बाळासाठी फक्त 40 दिवस सुट्टी घेतली कारण माझी आईने तसे मला बजावून सांगितले होते.

पूर्वी ती तिच्या आणि अर्जुनच्या नात्याबद्दल बऱ्यापैकी शांत असायची पण आता ती या नात्याबद्दल बरीच गं-भीर झाली आहे माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की मी समुद्रकिनार्यावर लग्न करीन आणि पूर्णपणे पांढऱ्या रंगामध्ये होईल. मला लग्नात सर्व काही पांढरे  हवे आहे. लग्नाचा ड्रेस सुद्धा पांढरा लेहंगा असेल. ब्राइड्समेट्स म्हणजे माझी गर्लगैंग असेल. मला ब्राइड्समेट्स ची संकल्पना खूप आवडते.

नेहाशी बोलताना मलायका अर्जुनबद्दलही बोलली. मलायका म्हणाली अर्जुनला असे वाटते की मी चांगले फोटोज काढत नाही तर तो माझे चांगले फोटो घेत असतो. आयुष्यात दुसऱ्यांदा संधी क्वचितच मिळते असं म्हणत मलायकाने अर्जुनसोबतच्या नात्याला कबुली दिली होती. त्यापूर्वी या दोघांबद्दलच्या चर्चां वेग धरू लागल्या होत्या. पण नंतर आपल्या नात्यावर बोलणं अर्जुन-मलायकानं टाळलं होतं.

एका मिडिया वेबसाइटला मलायका व तिची बहीण अमृता अरोराने मुलाखतीत दिली. या मुलाखतीत मलायका म्हणाली अर्जुन आणि माझ्याबद्दल खूप चर्चा पसरल्या होत्या. कोणत्याही आधारा विना गोष्टी मिडिया मध्ये दाखवल्या जात होत्या. त्या चर्चांचा माझ्या कुटुंबीयांवर परिणाम होत होता. रोज उठून पाहिलं तर एक नवी बातमी दिसायची. शेवटी म्हटलं की आपणहूनच खरं काय ते सांगून चर्चांना पूर्णविराम देऊ.

अर्जुन तुला कसा वाटतो असा प्रश्न अमृताला विचारता असता ती म्हणाली तो खूप शांत आहे. या मुलाखतीत मलायकाने तिच्या लग्नाबाबतच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली. मला कळत नाही की लोकांना इतकी घाई का आहे. एकमेकांना पूर्णपणे ओळखण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सध्या यातच आम्ही आनंदी आहोत असे मलायकाने सांगितले.

मलायका आणि अरबाज खान यांनी २०१७ मध्ये घट-स्फोट घेतला. १८ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे वेगळे झाले. सध्या अरबाज जॉर्जिया अँड्रियानी या मॉडेलला डेट करत आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे दोघे जवळपास 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर एकत्रितपणे बरेच फोटोज शेअर केली आहेत.

आणि त्यावेळी दोघेही असे म्हणतात की ते फक्त चांगले मित्र आहेत. मलायकाच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर जेव्हा ती पहिल्यांदा इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा तिला डार्क स्किन आणि गोरा त्वचेमध्ये खूप फरक पडत असताना तिला खूप संघ-र्ष करावा लागला पण तिच्या चल चैया चैया गाण्यानंतर तिला बरीच लोकप्रियता मिळाली.