बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सुरुवाती पासूनच हिरो आणि हिरॉईनची क्रेझ जेवढी चाहत्यांमध्ये असते तेव्हडीच खलनायकाच्या भूमिकेसाठी पणअसते. प्रत्येक चित्रपटात नायक आणि खलनायक ची भूमिका असते. अशा परिस्थितीत असे अनेक कलाकार आहेत.
ज्यांनी केवळ नकारात्मक भूमिका साकारून त्यातून अधिक प्रसिद्धी मिळवली आहे. प्रेम चोप्रा, रणजीत, अमजद खान, गुलशन ग्रोव्हर ही अशीच काही त्यांची नावं आहेत. यापैकी अजून एक दुसरे नाव खूप प्रसिद्ध आहे ते म्हणजे डॅनीचे आहे.
डॅनीचे पूर्ण नाव डॅनी डेन्झोंगपा आहे. डॅनीचा जन्म 1948 मध्ये सिक्कीममधील गंगटोक येथे झाला होता. डॅनी चे वय ७४ आहे. डॅनी हा भुतिया जातीचा आहे. डॅनीने 1971 मध्ये आलेल्या ‘जुर्रट’ चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती, 1972 मध्ये गुलजारच्या ‘मेरे अपने’ चित्रपटात त्यांना मोठा ब्रेक मिळाला होता.
डॅनीने पहिल्यांदा 1973 मध्ये आलेल्या ‘धुंद’ चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती. यानंतर डॅनीने नकारात्मक भूमिकांमधून आपली खूप प्रगती साधली आहे, डॅनीला बॉलिवूड इंडस्ट्री मधील आज सर्वात भयानक खलनायक मानले जात आहे.
आज आम्ही तुम्हाला डॅनीच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत. डॅनीने 1990 मध्ये गवा डेन्झोंग सोबत लग्न केले होते. गवा हे सिक्कीमच्या राज घराण्यातील आहेत. गावं खूप सुंदर आहेत. गवा आणि डॅनीने वर्षभर डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
अनोळखी मुलीशी लग्न करणार नाही, डॅनी असे म्हणाला होता. डॅनीला सुरुवातीला गवासोबत लग्न करायचे नव्हते. प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबीसोबतही डॅनीचे अफेअर होते. दोघांनी 7 वर्षे एकमेकांना डेट केले पण नंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले होते.
यानंतर डॅनीला जेव्हा कळले की गवा राजेशाहीचा घरातील कन्या आहे, तेव्हा त्यांनी गवा सोबत लग्न करण्यासाठी होकार दिला होता. आज दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गवा गृहिणी असून दोघांचाही खूप सुखी संसार आहे.
डॅनीने आपल्या अभिनयातून खूप मोठे नाव कमावले आहे. डॅनी हा 2019 च्या मणिकर्णिका चित्रपटात दिसला होता. सध्या त्याच्या ‘उचाई’ या चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू आहे. डॅनीने दोनदा सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला आहे. डॅनीला हा पुरस्कार 1992 मध्ये ‘सनम बेवफा’ आणि 1993 मध्ये ‘खुदा गवाह’साठी मिळाला होता.