बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध कपूर परिवारामध्ये लवकरच कुटुंबियांच्या घरात एक खूप मोठी आनंदाची बातमी येणार आहे. दोनच महिन्यांपूर्वी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल 2022 रोजी सर्व परिवारासमोर आणि नातेवाईकांच्या उपस्थित पूर्ण रितीरिवाजांनी लग्न केले होते.
गेल्या काही कालावधीपासून ब्रह्मास्त्र या चित्रपटामुळे चर्चेत असलेली आलिया भट्ट हिने नुकतीच एक मोठी आनंदाची बातमी सोशिअल मीडियावर शेअर केली आहे. तसे ती नेहमी सोशिअल मीडियावर सक्रिय असते आणि नवीन नवीन फोटो शेअर करून आलिया पोस्टच्या माध्यमातून आनंद व्यक्त करत असते.
पण यावेळेस तिने सर्वात जास्त आनंद देणारी बातमी सोशिअल मीडियावर शेअर केली आहे या मुळे चाहते आणि पूर्ण कपूर परिवार खूप खुश आहे. ही आनंदाची बातमी संपूर्ण कपूर कुटुंबाल समजताच त्याचा आनंद सीमा पार गेला आहे. सर्व खूप खुश झाले आणि रणवीर कपूर, आलिया भट्ट ला शुभेच्छा देऊ लागले.
आलिया भट्टने नुकतेच हॉस्पिटलमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ते पाहून आलिया भट्टचे चाहते आणि स्वतः कपूर कुटुंबीयही खूप उत्सुक झालेले आहेत. आलिया भट्टने तिची आगामी आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना आणि कुटुंबियांसोबत कशी शेअर केली ते आम्ही तुम्हाला आज या लेखाद्यावर सांगणार आहोत.
आलिया भट्टने एका गोंडस आणि सुंदर अश्या फोटोसह घोषणा केली की, त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा येत आहे :- 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबं’धनात अडकलेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी नुकतीच एक खूप मोठी आनंदाची बातमी सोशिअल मीडियावर शेअर केली आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघंही जवळपास 4 वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी एकमेकांच्या आयुष्यभर सोबत राहण्याच्या निर्णय घेतला आणि लग्न करण्याचे ठरवले. या दोन्ही जोडप्यांच्या लग्नाला बॉलीवूडचे सर्व सेलिब्रिटी पोहोचले होते आणि त्यांचे लग्न खूप भव्यदिव्य झाले होते.
दोघेही लग्नानंतरच आपापल्या कामात व्यस्त झाले, पण अलीकडेच आलिया भट्टने तिच्या सोशल मीडिया साईटवर शेअर केलेली गोड बातमी पाहून संपूर्ण कपूर कुटुंब आनंदी झाले आहे. आलिया भट्टची ही छायाचित्रे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत जी तिने सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
आलिया भट्टला 3 दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि आता तिने तिथून एक अतिशय सुंदर फोटो सोशिअल मीडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये तिने असे सांगितले आहे की, तिच्या घरी एक छोटा सा पाहुणे येणार आहे.
आलिया भट्टने शेअर केली हॉस्पिटलमधून रणबीरसोबतची सुंदर छायाचित्रे, छोटा पाहुणा येत आहे:- ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आलिया भट्ट तिची आई सोनी राजदानला भेटण्यासाठी लंडनला पोहोचली. 3 दिवसांपूर्वीच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आलिया भट्टने तिच्या चाहत्यांसाठी आणि तिच्या कुटुंबियांसाठी हॉस्पिटलमधून एक खूप मोठी बातमी शेअर केलेली आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाला नुकतेच 2 महिने पूर्ण झाले असून त्यांनी ही खूशखबर सोशिअल मीडियावर शेअर केली आहे.
आलियाने हॉस्पिटलमधून शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने सांगितले आहे की, लवकरच तिच्या घरी एक छोटा पाहुणे येणार आहे. या चित्रांमध्ये, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र दिसत आहेत आणि ते त्यांच्या गोंडस मुलाचे चित्र डिस्प्लेवर पाहू शकतात.