प्रेग्नेंसी घोषणेनंतर का चिडली आलिया? म्हणाली – मी पार्सल नाही, एक स्त्री आहे.

Bollywood

आलिया भट्टने सोमवारी तिच्या गरोदरपणाची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट द्व्यारे केली होती. सोशल मीडियावर फोटो पोस्ट होताच ही आनंदाची बातमी सगळीकडे व्हायरल झाली. आलिया आणि रणबीर कपूर देखील ट्विटरवर ट्रेंड करू लागले. चाहत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्याचे खूप अभिनंदन केले आहे.

रणबीर कपूर  आणि आलिया भट्ट  गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. १७ एप्रिल २०२२ रोजी ह्या दोघानीही लग्नगाठ बांधलेली  आहे.  2014 मध्ये आलियाने एका मुलाखतीमध्ये  रणबीर कपूर वर क्रश आहे असा  खुलासा केला होता.

2017 मध्ये दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हळूहळू आलिया-रणबीरच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. 2018 मध्ये या दोघांनी अभिनेत्री सोनम कपूरच्या रिसेप्शनला एकत्र हजेरी लावली होती.

यावेळी आलियाने हिरव्या रंगाचा लेहंगा आणि रणबीरने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि त्यावर जॅकेट परिधान केला होता. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर एका मुलाखतीत रणबीरने अभिनेत्रीला डेट करत असल्याची कबुली दिली होती.

त्यांनतर त्यानी १७ एप्रिल २०२२ रोजी दोघांनी सर्व परिवाराच्या इच्छेने आणि नातेवाईकांच्या उपस्तिथीमध्ये  लग्न केलं आहे. लग्नाला आता फक्त ३ महिने पूर्ण झाले आहे तर, आलीया आणि रणबीर कडून आनंदाची बातमी मिळाली आहे. त्यांच्या घरात काही महिन्यात पाळणा हालणार आहे.

आलिया भट्ट च्या गरोदरपणाची बातमी  सगळीकडे पसरताच, आलिया, यूकेमध्ये तिच्या पुढील चित्रपटाचे शूटिंग करत असून, जुलैच्या मध्यात मुंबईला परतणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहे. या सर्व बातम्यांवर आलिया भट्ट ने आता स्वतःचे  मौन तोडले आहे.

आलिया ने  इंस्टाग्राम स्टोरीवर स्पष्ट शब्दात या वृत्तावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचे वर्णन तिने स्पष्ठ  केले आहे. वृत्तानुसार असे समजले आहे की, आलिया भट्ट जुलैच्या मध्यात मुंबईला परतणार आहे  आणि रणबीर कपूर तिला घेण्यासाठी यूकेला जाणार आहे.

दुसऱ्या रिपोर्टनुसार  असे समजले आहे की, आलिया भट्ट ने शूट पूर्ण केल्यानंतर विश्रांती घेणार असल्याचे समजले आहे.  तिने तिच्या गर्भधारणेचे नियोजन पुढे अशा प्रकारे केले आहे की, त्यामुळे तिच्या कामाच्या बांधिलकीवर काही ही परिणाम होणार नाही.

तो ‘हार्ट ऑफ स्टोन’ आणि ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’चे शूटिंग जुलैच्या अखेरीस पूर्ण करणार आहे असे समजले आहे. आलियाने अशा बातम्यांना पितृसत्ताक विचाराने परिपूर्ण म्हटले आहे. ती असे म्हणाले आहे की, कोणत्याही परिस्थितीत विलंब झाला नाही आणि कोणीही मला  घेण्यासाठी युके ला  येणार  नाही.

मी  एक स्त्री आहे, कोणत्याही प्रकारचे पार्सल नाही. आलियाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर  असे लिहिले आहे की – ‘आम्ही अजूनही काही लोकांच्या मनात जगत आहोत, अजूनही पितृसत्ताक जगात जगत आहोत. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला असे सांगण्यासाठी खूप इच्छुक आहे  की, कोणत्याही कारवाईमध्ये कोणताही विलंब झालेला नाही.

मला घ्यायला कोणाला येण्याची गरज नाही, मी एक महिला आहे, कोणत्याही प्रकारचे पार्सल नाही.” आलिया भट्ट असे लिहिते की , ‘मला विश्रांतीची अजिबात गरज नाही, पण मला हे जाणून आनंद झाला की माझ्याकडे  डॉक्टरांचे प्रमाणपत्रही आहे.

हे २०२२ आहे. कृपया या जुन्या विचारातून बाहेर पडा. जर तुम्ही मला माफ केले तर माझा शॉट तयार आहे.” आलिया सध्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत गेल गॅडोट आहे. तत्पूर्वी आलियाने रणबीरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर  शेअर करत अभिनंदन करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

त्याने असे  लिहिले आहे की, ‘इतके प्रेम मिळाल्याने मी भारावून गेलो आहे. सर्वांचे मेसेज वाचण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला एवढेच सांगायचे आहे की तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असाच ठेवा हे खूप खास आहे. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानत आहे.