खरतरं आपल्या कानांवर एखादी गोष्ट फार अनोख्या पद्धतीने कधीकधी पडते. आणि जेव्हा ती गोष्ट खरी आहे हे समजतं तेव्हा मात्र आपल्याला प्रचंड प्रमाणात आश्चर्य वाटू लागतं. आता आज आम्ही तुम्हाला ज्या खऱ्याखुऱ्या घटनेबद्दल माहिती सांगणार आहोत ती घटना खरतरं एका सिनेमाच्या कथानकाशी जुळणारी पण खऱ्याखुऱ्या जिवणात घडलेली आहे.
बॉलीवुडमधील दिग्दर्शक संजय लीली भन्साळी यांच्या “हम दिल दे चुके सनम” या सिनेमाशी ही गोष्ट तंतोतंत जुळावी अशीच घडली आहे. बिहार राज्यातील जुमई या ठिकाणाहून प्रेम, त्याग आणि समर्पणाची ही गोष्ट समोर आल्याची पहायला मिळते. या गोष्टीच्या कथानकाचा शेवट हा एका प्रेमी युगलाच्या जोडप्याच्या लग्नाने होतो.
परंतु मुळात हे लग्न ज्या व्यक्तीकडून लावलं जातं ते फारच चमत्कारिक वाटावं असचं प्रकरण आहे. तर आता मुळ घटनेवर जरा आपण प्रकाश टाकणार आहोत. विकास कुमार हा जमुई येथील बथलर या गावाचा रहिवासी आहे. विकास कुमार हा बंगलुरू या शहरात नोकरी करत होता.
लग्नाच्या नंतरपासून तो आपल्या पत्नीसह इथेच बंगलुरू शहरात स्थायिक झाला होता. विकास कुमार याचं हे खरतरं दुसरं लग्न होतं. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर शिवानी नावाच्या महिलेशी दोन वर्षांपुर्वी त्याने विवाह केला होता.
काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी विकासच्या हाती शिवानीच्या सामानातून एक फोटो हाती लागला. हा फोटो साहजिकचं शिवानीचा प्रेमी सचिन याचा होता. परंतु त्याने याबाबत आपल्या पत्नीशी काहीच चौकशी वगैरे केली नाही.
आता मुळात विकासला कळून चुकलं होतं की, आपल्या पत्नीचं प्रेम कोणा दुसर्या व्यक्तीवरच होतं. परंतु तो तरीही तिला काही बोलला नव्हता. या घटनेत मजेशीर गोष्ट तिथे घडली जेव्हा या महिलेचा प्रेमी सचिन हा बंगलुरू शहरात दा-खल झाला.
आता बिहारमधील सचिनला जेव्हा समजलं होतं की, विकास त्याची पत्नी शिवानी हिच्यासोबत बंगलुरू शहरात राहू लागला आहे तेव्हा सचिनने बंगलुरू शहरात त्याच्या काकांकडे नोकरी करायला जातो अशी थाप मारून घरातून तो बाहेर पडून बंगलुरू शहरात दाखल झाला होता. यानंतर शिवानीला तो भेटायला जाऊ लागला.
शिवानीचं त्याला भेटणं आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत येऊ लागलं. आणि लोकांमधे तिच्याबद्दल कुजबुज वाढली. मग विकासने तिला अनेकवेळा भेटायला जाऊ नकोस असं समजावण्याचा प्रयत्न केला पण तिचं मन ते ऐकण्याच्या बाहेर गेलं होतं. ती त्याला तरीही भेटतं राहिली. पुढे विकासने ठरवलं की या दोघांच लग्न करून दिल्याखेरीज पर्याय नाही.
म्हणून त्याने शिवानीला लग्नाचा प्रस्ताव ऐकवला तिने तात्काळ होकार दिला. पुढे हे लग्न स्वत: नवऱ्याने स्थानिकांच्या उपस्थितीत लावलं आणि त्याचा व्हिडिओदेखील बनवला.
तर एकूणच हा प्रकार असा घडला. थोडक्यात काय तर एका नवऱ्याने पत्नीच्या प्रियकराशी तिचं लग्न लावून दिलं. हे ऐकल्यानेच फार धक्का बसतो. ही गोष्टचं इतकी निराळी घडली आहे.
मित्रांनो तर तुम्ही सांगा, हे अशा प्रकारचं लग्न लावून विकासने लोकांसमोर एक आदर्श ठेवला आहे का? जर हो तर का? आणि नाही तर कशामुळे? मुळात तुम्हाला तुमच्या पत्नीच्या प्रियकराबद्दल समजलं तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असली असती? आपलं उत्तर कमेंट करून आवर्जून कळवा. धन्यवाद