अभिनेते नाना पाटेकर हे मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील खूपच प्रसिद्ध अभिनेता आहेत.
नाना पाटेकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये कठोर परिश्रम घेऊन आणि अनेक धडपडीतून सावरत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे.
जगाची आणि जगण्याची जान असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी नाना पाटेकर हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील नटसम्राट म्हणून त्यांना ओळखले जाते.
नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र येथे झाला होता, नानांनी मुंबईमधील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले.
नानांना स्केचेस बनवण्याचा छंद आहे. कलाशिक्षणाच्या काळामध्ये नानांनी कॉलेजच्या अनेक नाटकांमध्ये काम केले आहे.
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील अशा अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जी एके काळी नाना पाटेकर यांच्यावर अतोनात प्रेम करत होती.
इथे आम्ही ज्या अभिनेत्रीबदल बोलत आहोत तिचे नाव आहे मनीषा कोईराला. नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला एकमेकांच्यावर खूपच प्रेम करत होते. त्यावेळी या दोघांच्या अफेयरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या.
परंतु या दोघांचे लग्न होऊ शकले नाही कारण नाना पाटेकर हे आधीच विवाहित होते. नानांना मनीषासोबत लग्न करायचे होते परंतु मनीषा कोईरालाचे असे म्हणणे होते कि जोपर्यंत नाना आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देत नाहीत तोपर्यंत ती त्यांच्यासोबत लग्न करणार नाही.
पण नाना आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊ इच्छित नव्हते. याच कारणामुळे मनीषा कोईराला आणि नाना पाटेकर यांचे लग्न होऊ शकले नाही आणि ते वेगळे झाले.
काही काळापूर्वीच मनीषा कोईरालाने कर्करोगावर मात करून बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले आहे. या काळामध्ये मनीषाची इतकी वाईट अवस्था झाली होती कि तिला ओळखणेदेखील खूप कठीण झाले होते.
कर्करो गावर मात केल्यानंतर तिने रणबीर कपूरच्या संजू चित्रपटामधुन बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले होते. तर नाना पाटेकर सुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये अजून कार्यरत आहेत आणि अनेक चित्रपटांमध्ये ते काम करताना पाहायला मिळत आहे.