बॉलिवूड इंडस्ट्रीतील अभिनेता विकी कौशलची लोकप्रियता ही संपूर्ण देश- विदेशात पसरलेली आहे. नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे त्यातूनच हे सिद्ध होत आहे.
जेव्हा विकी कौशल बद्दल एका महिला चाहत्याला असे समजले होते की, विकी कौशल त्याच हॉटेलमध्ये थांबला आहे जिथे तिचे लग्न आहे, तेव्हा ती तिच्या हॉटेलच्या खोली बाहेर पोहोचली. मग तिने संपूर्ण हॉटेल डोक्यावर घेतले होते.
इंटरनेटवर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये असे दिसत आहे की,आजच्या नववधू त्यांच्या लग्नासाठी खूप मोठी यादी ठेवतात. कोणता लेहेंगा घालायचा आणि कुठे तयार व्हायचं , हे सगळं आधीच ठरलेले असते. काही नववधू लग्नापूर्वी असा प्रश्न विचारतात की ऐकून लोक आश्चर्यचकित होतात.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये वधू एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला भेटण्याची मागणी करताना दिसत आहे. हा मजेदार व्हिडिओ लोकांना खूप पसंत केला जात आहे.
नववधू आणि तिच्या बहिणी विकीच्या स्किल टीमशी बोलत आहेत. वराने विकीच्या टीमला त्याला एकदा भेटू देण्याची विनंती केली आहे .ती महिला चाहती असे म्हणते आहे की, ती तिच्या भावी पतीला विकी कौशल ला भेटण्यासाठी थांबवू शकते.
व्हायरल व्हिडिओमध्ये प्रेरणा नेगी असे म्हणते आहे की, “माझा नवरदेव खाली माझी वाट पाहत आहे, पण जोपर्यंत तुम्ही मला विकी कौशल सोबत फोटो काढू देत नाही.”तोपर्यंत मी मंडपात जाणार नाही.
तरुणीला तिच्या लग्नाच्या दिवशी जरी विकी कौशल ला भेटता आले नसले तरी भविष्यात ती विकी कौशल ला नक्की भेटू शकेल अशी आशा व्यक्त करत आहे. हा व्हिडिओ काढलेला आहे तो एप्रिल महिन्यातील आहे.
प्रेरणा नेगीचा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. बहुतेक लोकांनी व्हिडिओच्या कमेंट विभागात हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. त्याचवेळी काही यूजर्स विकी कौशलला प्रश्न विचारत आहेत की तो वधूला का भेटला नाही. एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, विकी, वधूला न भेटून तू माझे हृदय तोडले आहेस.
त्याचवेळी एका युजरने वधूला विचारले की तिने तिचा मेकअप कुठून केला. या व्हिडिओला 30 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या नववधूने ज्या पद्धतीने विकी कौशलला भेटण्याचा आग्रह धरला त्यावरून त्याच्या फॅन फॉलोइंगचा अंदाज लावता येतो.
त्यावेळी विकी कौशल मसुरीमध्ये तृप्ती डिमरी आणि एमी विर्कसोबत त्याच्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग करत व्यस्थ होता. विकी कौशल च्या फॅनचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स त्याला वेडा म्हणत आहेत.
विकी कौशल सध्या मेघना गुलजारच्या ‘साम बहादूर’ या चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटात विक्कीसोबत सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांच्याही भूमिका दर्शवलेल्या आहेत. याशिवाय उनाडकटच्या चित्रपटात विकी कौशल लक्ष्मण सारा अली खानसोबत दिसणार आहे.
याशिवाय विकी कौशल शशांक खेतानच्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकरसोबत सुद्धा दिसणार आहे.
View this post on Instagram