दुसऱ्या मुलाला जन्म देण्यापूर्वी ट्विंकलने अक्षय समोर ठेवली होती हि अट,जाणून घ्या आश्चर्यचकित नका होऊ …

Bollywood Entertenment

बॉलिवूड  इंडस्ट्री व त्यातील मैरिड कपल्स हे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात.  त्यातील एक जोडी म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना. या जोडीची नेहमीच  होत असते. या दोघांची जोडी एक उत्तम वैवाहिक कपल आहे. हे कपल बर्‍याचदा सोशल मीडिया आणि सार्वजनिक कार्यक्रम व उपक्रम यामध्ये भाग घेत असते.

या दोघांची पहिली भेट ही फिल्म फेअरच्या फोटोशू ट दरम्यान भेट झाली होती. ट्विंकला बघताक्षणी  अक्षय तिच्यासाठी वेडा झाला होता, तिच्या प्रेमात पडला होता. यानंतर ह्या जोडीने जेव्हा इंटरनॅशनल खिलाडी मध्ये एकत्र काम केले, तेव्हा ते एकमेकांजवळ जास्त आले व त्यांचे प्रेम आणखीन वाढू लागले.

अक्षय होता १५ दिवसांचा बॉयफ्रेंड:-  ट्विंकलने एका तिच्या मुलाखतीत सांगितले, की जेव्हा तिची आणि अक्षयची भेट झाली तेव्हा नुकताच त्याचा ब्रेकअप झाला होता. पूर्वीचे नाते बदलले होते. अशा अवघड परिस्थितीत त्याला जवळची अशी एखादी व्यक्ती पाहिजे होती त्या व्यक्तीबरोबर तो थोडा वेळ आनंदाने घालवू शकेल. त्यानंतर तिने अक्षय तिचा १५ दिवसांचा बॉयफ्रेंड बनला. याच १५ दिवसांमध्ये ती अक्षयच्या खऱ्या प्रेमात पडली आणि त्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा विचार केला.

ट्विंकलने लग्नासाठी ठेवली होती अट:- अक्षयला लग्नाची घाई होती, पण ट्विंकलला त्यांच्या नात्याला थोडा वेळ द्यायचा होता. तसे तर त्या वेळी ट्विंकलचे करिअर पण खूप चांगले चालले होते. अक्षयचे असे मत होते, की लग्नानंतर ट्विंकलने सिनेमात काम करू नये.

या सगळ्या परिस्थितीत ट्विंकलने अक्षयला एक अट घातली व लग्न करण्यास सहमती दर्शविली. त्या वेळी, ट्विंकलचा मेला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. ट्विंकलने अक्षयला सांगितले की तिचा हा चित्रपट जर चालला नाही आणि फ्लॉप झाला, तर ती त्याच्याशी लग्न करेल आणि नक्की सेटल होईल.

त्यानंतर, मेला हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा तो वाईटरित्या फ्लॉप झाला. मग कबुल केल्याप्रमाणे, ट्विंकलने अक्षयसोबत लग्नाचे सात फेरे घेतले. लग्नानंतर ट्विंकल यांनी आपले चित्रपटांमधील काम बंद केले. आत्ताच्या काळात ती एक लेखिका म्हणून काम करते आहे. तिची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत.

ट्विंकलने लग्न करण्यापूर्वि अक्षयच्या कुटुंबाची माहिती काढली होती:- तिच्या एका मुलाखतीत ती म्हणते की लग्नाआधी तिने अक्षयच्या कुटूंबाची पूर्ण माहिती करून घेतली होती. अक्षयच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीस गंभीर आजार आहे की नाही याची माहिती घेतली होती. यामागे हाच उद्देश होता,  ट्विंकलला आपल्या भविष्यात होणार्‍या मुलांना निरोगी बनवायचे होते.

ट्विंकलने घातली एक अट दुसर्‍या मुलाला जन्म देण्यापूर्वी :- जेव्हा त्या दोघांनी दुसर्‍या मुलासाठी योजना बनविली, त्याआधी ट्विंकलने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती. ही गोष्ट त्यांनी कॉफी विथ करण या कार्यक्रमात सांगितली. तिने अक्षयला सांगितले होते की जोपर्यंत तो दर्जेदार आणि चांगले चित्रपट करत नाही, तोपर्यंत दुसर्‍या मुलाचा विचार ती करणार नाही.

अक्षय सांगतो, की त्यावेळी त्याच्या बॉलिवूडमधील यशस्वी होण्यामध्ये व उत्तम करिअरमध्ये ट्विंकल खन्नाचा मोठा हात आहे. करणच्या या शोमध्ये अक्षय आणि ट्विंकलचा खूपच आनंदी व मजेशीर अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला होता.

अक्षयच्या सासूला वाटत होते की तो एक समलिंगी आहे:- दूसरा एक मजेशीर किस्सा शेअर करताना ट्विंकलने सांगितले की तिची आई डिंपल कपाडिया अक्षयला गे मानत होती. त्यानंतर डिंपलने आपल्या मुलीला, म्हणजेच ट्विंकलला लग्नापूर्वी अक्षयसोबत एक वर्ष राहून बघ असा सल्ला दिला होता.

बॉलिवूडमध्ये एक अतिशय प्रसिद्ध व आदर्श जोडी म्हणून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्नाकडे पाहिले जाते. अक्षय हा बॉलिवूडचा आघाडीचा कलाकार म्हणजेच सुपरस्टार आहे तर ट्विंकल खन्ना एक निर्माती आणि लेखिका अशी तिची ओळख आहे. त्या दोघांना दोन मुले आहेत, त्यांची नावे आहेत आरव व मुलीचे नाव नितारा.