da930916f477c845162dd9b599591853
आपण प्रत्येक लोक कधी न कधी आपण पेन चा वापर नक्कीच केला असेल. जरी सध्या चे जग इतके आधुनिक झाले असले तरीही पेनचा वापर अद्याप देखील कमी झालेला दिसत नाही. पेन एकेकाळी फॅशन म्हणून खिश्यात ठेवून वापरले जात असत.
लोक आपल्या शर्टच्या खिशात घालून लोक बाहेर जात असत कारण यामुळे तो माणूस अधिक हुशार आणि श्रीमंत आहे असे बाकी लोकांना वाटत असे. जो कोणी लेखक असेल आणि जर त्याच्याकडे पेन नसेल तर लोक त्याला लेखक म्हणत नसत. या आपल्या पेनमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. आता नवीन शोध लागत गेले म्हणून पेन देखील बदलत गेले आहे. बॉल पेनपासून ते फाउंटेन पेनपर्यंत असे पेनने विकासात बरेच दूरचे अंतर पार केले आहे.
पेनच्या रचणेबद्दल बोलले तर हे पातळ शाईने भरलेले सुमारे 20 ते 30 सें.मी. एक ट्यूब असतात. जर पेनच्या टोकावर बघितले असता आपल्याला त्यावर शेवटी एक छिद्र दिसेल. प्रत्येक लोकांनी एकदा न एकदा पेन वापरलाच असेल परंतु पेनच्या शेवटी किंवा टोकावर का असे छिद्र का बरे आहे याबद्दल आपल्याला फारसे माहिती नसेल. चला आज आपण या लेखाद्वारे हे जाणून घेवू.
पेनचे टोपण:- बहुतेक वेळा असे दिसते की पेनाच्या टोपणास मागील बाजूस एक लहान छिद्र असते. यामागील सर्वसाधारण आइडिया अशी आहे की पेनचे झाकनाला छिद्र केल्याने आत मधली शाई कोरडी होत नाही. परंतु हा विचार योग्य नाही. कारण यामुळे पेनची शाई कोरडी होण्याचा वा कोरडी न होण्याचा काही स*बंध नाही. असेही म्हटले जाते की टोपणाच्या या छिद्रामुळे झाकणातून पेन बंद केल्यावर ते बाहेरील बाजूस आणि आत निब शाईचा दबाव बरोबर राहतो.
ही विचार देखील योग्य असल्याचे सिद्ध होत नाही. कारण इतका छोटा पेन आणि आणि त्याला असणारे छिद्र हे त्यांना लागू होत नाही. तसेच लोकांना वाटते की पेनमधील छिद्र कंपन्यांनी पेन चांगले दिसण्यासाठी वापरला आहे. पण असे देखील काही नाही.
मग मूळ कारण आहे तरी काय:- तर असे आहे की आपल्या सु रक्षेसाठी पेनच्या टोपणनास आणि पेनच्या मागील बाजूस असे छिद्र दिली जातात. जर एखाद्या लहान मुलाने पेन चे टोपण किंवा पेन गिळले तर ऑक्सिजन या छिद्रातून मिळेल आणि ते मुलांसाठी जास्त घातक ठरणार नाही. पेनच्या टोपणाच्या आणि पेनच्या मागे असलेल्या छिद्रांचे आपली सुरक्षा हेच मुख्य कारण असते. सहसा असे दिसत असते की लिहिताना मुले टोपणाच्या बाजूला पेन चोकत असतात आणि चुकून ते पोटात जाण्याची शक्यता असते.
टोपणाच्या मागील छिद्रांमुळे ऑक्सिजन मिळणे थांबत नाही आणि मुलास त्रास होत नाही. थोड्या वेळे साठी या छिद्रा मधून श्वास मिळतो आणि नंतर त्या मुलास आपण डॉक्टरांकडे घेवून जाऊ शकतो. म्हणूनच पेन निर्मात्यांनी हे केले आहे.
यामागील एक वैज्ञानिक कारणही आहे बरं का :- पेनच्या टोपणास छिद्र या कारणासाठी देखील बनविला जातो जेणेकरून टोपण बंद झाले तरी तेव्हा आतल्या ऑक्सिजनचा प्रवाह चालू राहील आणि कार्बन डाय ऑक्साईडच्या दबावामुळे शाई बाहेर पडणार नाही.
da930916f477c845162dd9b599591853