13 मे रोजी आज सनी लिओनी 38 वर्षांची झाली आहे. तिने आपला वाढदिवस साजरा केला. तिने बॉलिवूड मध्ये अनेक चित्रपट आणि आयटम साँगमध्ये काम केले आहे. तिने जिस्म 2 या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. आजच्या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला सनी लिओनीच्या जीवनाशी सं-बंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.
एका मुलाखतीत सनी लिओनीने सांगितले की वयाच्या 21 व्या वर्षी माझे आयुष्य नकारात्मकतेने बदलले. जेव्हा मी पो-र्न इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली तेव्हा लोकांनी मला वाईट म्हंटले. या गोष्टीचा माझ्या आयुष्यावर खूप वाईट आणि नकारात्मक परिणाम झाला. पण माझ्या कुटुंबीयांनी मला प्रत्येक वाईट गोष्टीपासून वाचवण्याचा प्रयत्न केला. मी आतून पूर्णपणे तुटले होते.
पण माझ्या कुटुंबियांनी मला कधीही पो-र्न इंडस्ट्री सोडण्यास सांगितले नाही. जरी मला याबद्दल काहीही दु: ख नाही. मला माझे आयुष्य खूप आवडते. सनी लिओनी फिल्म जिस्म -2 मध्ये दिसल्यानंतर ती रागिनी ए-मएमएस 2 चित्रपटातही दिसली. 2017 मध्ये तिने एक मुलगी सुद्धा दत्तक घेतली. यानंतर तिने सरोगेसीच्या माध्यमातून दोन मुलींना जन्म दिला आहे. सध्या ती तीन मुलींची आई आहे.
वयाच्या 18 व्या वर्षी ती लैं-गिक अ-त्याचाराचा ब ळी ठरली असा खुलासा तीने एकदा केला होता. मी त्यावेळी म्युझिक व्हिडिओ शू-ट करत होते. त्यावेळी एका व्यक्तीने माझ्याशी गैरवर्तन केले होते. याबद्दल मी दिग्दर्शकाकडे त क्रार केली असली तरी त्या व्यक्तीला कोणी काहीच बोलले नाही.
तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो की काही दिवसांपूर्वी सनी लिओनीची बायोपिक वेब सिरीज करणजित कौर द अनटोल्ड स्टोरी रिलीज झाली होती ज्यामध्ये तिचा पो-र्न इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास दाखविला आहे. तिच्या आयुष्याशी सं-बंधित अनेक र-हस्ये या वेब सिरीज मुळे उघडकीस आली.
पॉ-र्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने आपला रस्ता बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली. बेबी डॉल या आयटम साँगने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर तिचं आयुष्यच बदललं होत.
त्यातही बिग बॉस च्या पाचव्या सीजन मध्ये तिने सहभाग घेतला. यावेळी खऱ्या आयुष्यात सनी कशी आहे हे प्रेक्षकांना समजले. आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण देणाऱ्या सनीच्या संपत्तीचा आकडा पाहून तुम्ही थक्क व्हाल.
एका इंग्रजी मासिकेला दिलेल्या माहितीनुसार सनीचा मुंबईतील बंगला अमेरिकेतील फ्लॅट महागड्या गाड्या हे सर्व मिळून एकूण ९७ कोटींची ती मालकीण आहे. काही वर्षांपूर्वीच सनीने अमेरिकेत फ्लॅट विकत घेतला. त्याची किंमत ३० कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जातं. तर मुंबईतील तिच्या बंगल्याची किंमत ३ कोटी इतकी आहे.
सनीने २०११ मध्ये डॅनिअर वेबरशी लग्न केलं. सनीच्या संपूर्ण प्रवासात डॅनिअलने तिची साथ दिली. लग्नापूर्वी काही वर्ष हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांनी निशा या मुलीला दत्तक घेतलं.
त्यानंतर सरोगसीच्या माध्यमातून तिला दोन मुले झाली. त्यापैकी एकाचं नाव अशर आणि दुसऱ्याचे नाव नोआ आहे. पती डॅनिअल आणि तीन मुले असं सनीचं कुटुंब आहे.
अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर प्रचंड एक्टीव असते. फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून ती सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अलिकडेच सनीने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला खुर्चीवर बांधले असुन सनी लिओनी त्याच्या समोर डान्स करताना दिसत आहे.