तर ह्यामुळे , कुत्र्यासोबत फुटपाथ वर झोपतो दहा वर्षीय हा अंकित,बघा वाचून डोळ्यात पाणी येईल …

Daily News

काही दिवसांपासून सोशल मिडिया वर उत्तर प्रदेशातील एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटो मध्ये सकाळच्या थंडीत एक मुलगा आणि कुत्रा हे एकाच पातळ ब्लँकेट मध्ये झोपले आहेत. लोकांनी हा फोटो बघून हळहळ व्यक्त केली आहे.

पूर्ण देशभरात हा फोटो व्हायरल झाला आहे. लोक या फोटोस शेअर करत आहेत तसेच तिथल्या प्रशासनास देखील यावरून धारेवर धरले जात आहे. आज आपण या फोटोमधील मुलगा कोण आहे आणि तो अशा परिस्थितीत कसा काय आला याबद्दल जाणून घेणार आहोत.

दहा वर्षांचा मुलगा अंकित कुठे राहतो हे त्याला आठवत नाही. त्याला फक्त एवढेच माहिती आहे की त्याचे वडील तु-रूंगात आहेत आणि आईने त्याला सोडले आहे. तो कधी फुगे विकायचा तर कधी चहाच्या दुकानात काम करायचा. अंकित त्याचा एकुलता एक मित्र डॅनी बरोबर फुटपाथवरच झोपतो.

डॅनी हा एक कुत्रा आहे. डॅनी हा अंकितबरोबर झोपत असतो आणि नेहमीच त्याच्याबरोबर राहतो. अंकितचे आयुष्य डॅनीसोबत गेल्या काही काळापासून चालू आहे. अंकित स्वतःला आणि डॅनीचे पोट भरण्यासाठी दररोज काही छोटी कामे करतो आणि आपले व डॅनीचे पोट भरतो.

सुमारे पंधरा दिवसांपूर्वी जबरदस्त थंडीने चालू असताना एका बंद दुकानाच्या समोर पातळ ब्लँकेट मध्ये झोपलेला अंकित आणि त्याचा कुत्रा यांचा फोटो क्लिक केला होता आणि तो खूप व्हायरल झाला. यानंतर स्वतः मुख्यमंत्री योगी यांनीही याची द खल घेतली.

त्यांच्या सूचनेनुसार मुझफ्फरनगर प्र-शासनाने मुलाला शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. अंकितला शोधण्यासाठी मुजफ्फरनगर ए सएस पी अभिषेक यादव यांनी प्रयत्न केला. तो आता पो लिसांच्या देखरेखीखाली आहे. ज्या दुकानात अंकितने बर्‍याच वेळा काम केले त्या मालकाच्या मते, त्याचा कुत्रा काम करत असताना एका कोपऱ्यात बसून  असतो.

दुकानदाराच्या मते अंकित हा खूप स्वाभिमानी मुलगा आहे. तो विनामूल्य काहीही घेत नाही. तसेच आपल्या कुत्र्यासाठी देखील कधी विनामूल्य दूध मागत नाही. काम करून जे पैसे मिळतात त्यातूनच तू स्वताचे आणि या कुत्र्याचे पोट भरतो.

मुझफ्फरनगरचे एसएसपी अभिषेक यादव म्हणाले की आता अंकित मुजफ्फरनगर पो-लिसांच्या देखरेखीखाली आहे. आम्ही त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्याचे फोटोज आजूबाजूच्या जिल्ह्यातील विविध पो-लिस ठा ण्यांकडे पाठविण्यात आले आहेत.

आम्ही जिल्हा महिला व बालकल्याण विभागालाही याबद्दल कळविले आहे. शहर कोतवालीचे एस एचओ अनिल कपारवान यांच्या म्हणण्यानुसार अंकित सध्या शीला देवी नावाच्या महिलेसोबत राहत आहे. अंकितला त्या महिलेची आधीपासूनच ओळख होती आणि तो तिला बाई म्हणून हाक मा’रतो.

अंकितच्या कुटूंबाची अचूक माहिती होईपर्यंत तो या महिलेकडेच राहणार आहे. आता त्याला एका खासगी शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे. स्थानिक पो-लिसांच्या विनंतीनुसार त्याला विनामूल्य शिक्षण देण्यास शाळा व्यवस्थापनानेही सहमती दर्शविली आहे.