झोपायच्या आधी प्रत्येक विवाहित जोडप्याने ही ६ कामे जरूर केली पाहिजेत म्हणजे….

Daily News Helth

अनेक वेळा असे होते की लग्नाचे सुरूवातीचे दिवस हे मोरपंखी असतात, आनंदी आनंद असतो. त्यामुळे लग्न झाल्यानंतर काही काळापर्यंत सगळे कसे अगदी व्यवस्थित चाललेले असते, परंतु, अचानक असे काही गोंधळ किंवा घटना आपल्याबाबतीत घडतात की वैवाहिक जीवन उध्वस्त होऊन जाते. तुम्ही कदाचित विश्वास ठेवणार नाही परंतु काही वेळेस झोपण्याच्या सवयींमुळे पती व पत्नी यांच्यामध्ये घटस्फोटाची परिस्थिति निर्माण झालेली उदाहरणे आहेत.

प्रत्येक जागेच्या काही नियम व अटी असतात, त्याचप्रमाणे शयनकक्षात काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे जरूरी आहे. काही वेळेस नकळत आपल्या हातून घडलेल्या चुका ह्या वैवाहिक नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतात. अशा वेळी हे नियम पाळून तुम्ही पण तुमच्या वैवाहिक जीवनाला नवीन व मोहक रंग देऊ शकता.

१. जर तुमच्या दोघांच्या झोपी जाण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतील, तर सर्वात प्रथम ही सवय सुधारून घ्या. नेहमी असा प्रयत्न करा, की तुम्ही दोघेही नवरा बायको एकाच वेळी झोपण्यासाठी बेडरूममध्ये म्हणजेच आपल्या शयनगृहात जाल. असे होणे नात्याच्या दृष्टीकोनातून योग्य नाही की दोघांपैकी कोणी एक जोडीदार झोपून जाईल व दूसरा काम पूर्ण करीत राहील.

२. असा प्रयत्न करा की झोपायच्या आधी तुमच्या हातात मोबाइल नसेल. शयनकक्षात टेलिव्हीजन ठेवणे टाळा. शक्य असेल, तर म्युझिक प्लेयर बेडरूममध्ये ठेवा म्हणजे रात्री मंद किंवा हळुवार संगीताची मजा तुम्ही घेऊ शकता.

झोपायच्या थोड्या आधी लॅपटॉप, मोबाइल, आणि टेलिव्हीजन यावर वेळ घालविण्याच्या व्यतिरिक्त योग्य हे होईल की तो वेळ तुम्ही आपल्या जोडीदाराबरोबर बोलण्यात व्यतीत करा. दिवसभराच्या घडलेल्या सुखद घटनांवर बोला ज्यामुळे दोघांनाही त्याचा आनंद एकत्र घेता येईल.

३. घरात काम करणारी कामवाली, कार्यालयीन राजकारण, नातवाईकांबद्दल वाईट बोलणे, हे सगळे करण्यापेक्षा हा वेळ तुम्ही दोघे एकमेकांशी बोलून, गप्पा मारून घालवा. प्रेमाच्या गोष्टी तुमच्या नात्याला मजबूत करण्याचे काम करतील. तुमच्यातील जवळीक वाढायला मदत होईल.

४. एकमेकांवर पूर्ण लक्ष केन्द्रित करा. तुम्ही केलेली छोटीशी स्तुतिदेखील किंवा कौतुक पण आपल्या जोडीदारासाठी खूप महत्वाचे असते. त्यामुळे त्याला वेगळाच आनंद मिळतो. झोपायच्या आधी जोडीदाराला असे जाणवून द्यायचा प्रयत्न करा की ती किंवा तो तुमच्यासाठी खूपच खास आहे. असे फक्त महिन्यातून एकदा नाही तर नियमित करा. तुमच्या नातेसंबंधात मजबूती व प्रेमभावना वाढण्यास यामुळे खूपच मदत होईल.

५. वेगवेगळ्या प्रकारे आपल्या प्रेमाचा आविष्कार दाखवा. कधी स्पर्श करून, तर कधी कौतुक करून तर कधी एखादी छानशी भेटवस्तू देऊन, तर कधी नुसते नजरेनेच आपले प्रेम व्यक्त करा. जोडीदार त्यामुळे नेहमी आनंदी राहील. माणूस हा स्तुतिप्रिय आहे, त्यामुळे कोणालाही यामुळे आनंदच मिळतो मग ती स्त्री असो वा पुरुष. आपल्या भावना कृतीतून व्यक्त करणे खूपच महत्वाचे आहे.

६. नुसते गुडनाईट न म्हणता, प्रेमाने किस करून ते म्हटले तर त्याचा जास्त चांगला प्रभाव पडेल व परिणाम दिसून येईल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी वातावरण तर सकारात्मक ठेवतीलच पण त्याचबरोबर तुमच्या दोघांमधील प्रेमाचे बंध मजबूत व सुदृढ होण्यास मदत करतील.

फक्त स्पर्शच सगळे काही आहे असे नाही, तर आपली प्रेमभावना दुसर्याच व्यक्तिपर्यंत पोहोचणे खूप जरूरी आहे. नुसते प्रेम आहे म्हणून उपयोग नाही, तर नेहमी ते दुसर्याप व्यक्तिला जाणवले तर ते जास्त वैवाहिक जीवनासाठी उपयोगी आहे.