करिश्मा कपूर आता 46 वर्षांची झाली आहे. करिश्माने 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले. करिश्मा अजूनही पूर्वीप्रमाणेच सुंदर दिसते. करिश्मा कपूरने दिल्लीतील उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले होते. पण त्यांचे लग्न काही वर्षांनंतर मोडले.
अभिनेत्री करिश्मा कपूरने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला. मात्र दिल्लीचा बिझनेसमेन संजय कपूर याच्याशी लग्न केल्यानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर राहिली. लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करणं कमी केलं आणि नवीन प्रोजेक्ट्ससुद्धा नाकारले. मात्र तिचं वैवाहिक जीवन फार काही सुखी नव्हतं. एका मुलाखतीत करिश्माने तिच्या लग्नाबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
घटस्फो टानंतर करिश्माने तिचा पती संजयवर अनेक गंभीर आ-रोप केले. करिश्माचा हा प्रेमविवाह होता. जेव्हा करिश्मा व संजय हनिमूनला गेले होते तेव्हापासून हळूहळू गोष्टी बिघडू लागल्या होत्या.
करिश्माने मुलाखतीत सांगितले होते की लग्नानंतर मी आणि संजय हनिमूनला गेल्यानंतर संजयने त्याच्या मित्रांमध्ये माझी किंमत केली होती. त्याने मला त्याच्या मित्रांसह रात्र घालवण्यास भाग पाडले. पण जेव्हा मी यासाठी तयार नव्हते तेव्हा त्याने मला मारहाण केली.
लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षे करिश्मा-संजयचं नातं चांगलं होतं. मात्र पाच-सहा वर्षानंतर या दोघांमध्ये वादवि वाद सुरू झाले. २००३ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती आणि २०१६ मध्ये ते वेगळे झाले.
एवढेच नव्हे तर करिश्मा कपूरची सासूसुद्धा तिला खूप त्रास देत असे. करिश्माचे पती संजयने आपल्या भावाला तिच्याकडे लक्ष ठेवायला सांगितले.त्यामुळे तिला कंटाळा आला होता आणि त्याने २०१२ मध्ये संजय कपूरला घटस्फो ट देण्याचे ठरवले त्यानंतर ती आपल्या आईवडिलांच्या घरी गेली.
या दोघांचे 2016 मध्ये घटस्फो ट झाले. घटस्फो टानंतर आता त्यांची दोन्ही मुले समायरा आणि रिआन ही करिश्माकडेच राहत आहेत. घटस्फो टाच्या बदल्यात करिश्माने 10 कोटींची संपत्ती घेतली होती. करिश्माचा माजी पती संजयही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलत आहे.
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची लव्हस्टोरी सर्वांना ठावूक आहे. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेल्या या जोडीने लग्नाचा निर्णय घेतला होता.
मात्र काही कारणास्तव त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. विशेष म्हणजे लग्न करण्यासाठी तयार असलेल्या या दोघांनी साखरपुडा करुन लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या होत्या. मात्र ऐनवेळी हा साखरपुडा मोडण्यात आला. हा साखरपुडा मोडण्यामागे जया बच्चन कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं.
२००२ साली अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी अभिषेक आणि करिश्मा यांचा साखरपुडा करण्यात आला होता. मात्र साखरपुडा झाल्यानंतर अचानक हा साखरपुडा मोडण्यात आला. विशेष म्हणजे जया बच्चन यांच्या काही अटी असल्यामुळे अभिषेक- करिश्माचं लग्न होऊ शकलं नाही. आपल्या सुनेने लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम करणं जया बच्चन यांना मान्य नव्हतं आणि करिश्मादेखील काम सोडण्यास तयार नव्हती.
त्यामुळेच या दोघींमध्ये वाद निर्माण झाले आणि याच कारणामुळे दोन्ही कुटुंबामधील नाते बिघडले. करिश्मा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या डेंजरर्स इश्क या चित्रपटात शेवटी झळकली होती. त्यानंतर फार कमी वेळा ती मोठ्या पडद्यावर आली. करिश्मा लवकरच वेबसीरिजच्या माध्यमातून कमबॅक करत असून या सीरिजची निर्मिती प्रसिद्ध निर्माती एकता कपूर करणार आहे.
अल्ट बालाजीच्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारी ही सीरिज अमेरिकन टीव्ही सीरिज प्रिटी लिटील लायर्स वर आधारित असून करिश्मा यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मेंटलहुड असे या सीरिजचं नाव असून यामध्ये सं घर्ष करणाऱ्या पाच आईची कथा उलगडली जाणार आहे.