जेव्हा प्रियांका चोपड़ाच्या कानफटात मारण्यासाठी चित्रीकरणाच्या सेटवर पोहोचली होती अक्षयकुमारची पत्नी, त्याचे कारण समजले तर विश्वास नाही बसणार ..
आता आपल्या देशात सर्वत्र लॉकडाऊनची स्थिति आहे. त्याच कारणाने बॉलिवूड कलाकारसुद्धा सध्या आपल्या कुटुंबियांसमवेत त्यांच्या घरातच वेळ व्यतीत करीत आहेत. पण सध्याच्या काळात सोशल मीडिया खूपच क्रियाशील आहे. सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेते व अभिनेत्रींबद्दल अनेक गोष्टी आणि घडलेल्या घटना समोर येत आहेत.
आता अक्षय कुमारचा एक गमतीशीर किस्सा सोशल मीडियावरही व्हायरल होतो आहे. बॉलिवूडमध्ये एखाद्या कलाकाराला प्रसिद्धी मिळू लागली, की त्यामागोमाग त्या कलाकाराच्या खासगी जीवनातील घटनांविषयी बऱ्याच चर्चा रंगू लागतात. या कलाकारांच्या यादीत एक नाव आहे ते म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याचे. हा अनेक लोकांचा खूपच आवडता अभिनेता आहे, त्याचबरोबर त्याची ओळख “खिलाडी कुमार” अशी आहे.
घराणेशाही नाही तर स्वत:च्या अभिनयाच्या बळावर, कोणाचेही पाठबळ नसताना याने या बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपले वेगळे असे स्थान निर्माण केले, नाव कमावले. प्रसिद्धी त्यापाठोपाठ मिळालेले यश यासोबतच अक्षय कुमार त्याच्या अनेक प्रेमप्रकरणांमुळे देखील सोशल मीडियामध्ये चर्चेत राहिला आहे.
सध्या तो जरी परफेक्ट फॅमिली मॅन झाला असला तरी कोणे एकेकाळी त्याचे नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जसे की पूजा बत्रा, आएशा झुल्का, रवीना टंडन, रेखा, शिल्पा शेट्टी आणि प्रियांका चोप्रा यांच्याबरोबर जोडले गेले होते. तो शिल्पा शेट्टी सोबत अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होता पण हे सर्व ट्विंकलसोबत विवाहबंधनात अडकण्याच्यापूर्वी.
अक्षय कुमारच्या प्रेमप्रकरणांची यादी खूप जास्त आहे. आता अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाशी लग्न केले आहे. पण या विवाहानंतरसुद्धा अक्षय कुमारचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते., त्यातील एक म्हणजे प्रियांका चोप्रा. अक्षय कुमारचे नाव लग्नानंतर हिच्याशी जोडले गेले होते. यांच्या प्रेमसंबंधांचि चर्चा खूप रंगली. “अंदाज” या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली. “आएगा मजा अब बरसात का” या गाण्यावर दोघांनी पावले थिरकली आणि त्या दोघांचीही वेगळी केमिस्ट्री पाहण्याची संधी मिळाली होती.
यानंतर अक्षय-प्रियांका ही जोडी पुढील अनेक फिल्म्समध्ये झळकली. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर जुळली होती, सोबतच ऑफस्क्रीन नात्याची फिल्म जगतात जोरदार चर्चांनी जोर धरला होता. “ऐतराज” “मुझसे शादी करोगी” “वक्त- द रेस अगेन्स्ट टाइम” या चित्रपटांमधून काम करणारे अक्षय कुमार आणि प्रियांका रिलेशनमध्ये असल्याची चर्चा होऊ लागली.
ट्विंकलला जेव्हा त्यांच्या या प्रेमप्रकरणांची माहिती मिळाली, तेव्हा ट्विंकलने लगेचच अक्षयला प्रियांकापासून दूर रहाण्याचे सूचित केले. पण जेव्हा ट्विंकलला लक्षात आले, की तिच्या बोलण्याचा अक्षयवर कोणताही परिणाम होत नाही, तेव्हा मात्र तिने प्रियांकाशी बोलण्याचा निर्णय घेतला. प्रथम फोनवर या दोघींचे मोठे भांडण झाले होते.
ट्विंकलल प्रियंकाचा खूपच राग आला होता व तिला समज देण्यासाठी ती थेट “वक्त- द रेस अगेन्स्ट टाइम” या चित्रपटाच्या सेटवर पोहोचली असे म्हटले जाते आहे. अक्षय आणि प्रियांका यांच्या चर्चेत असलेल्या प्रेमप्रकरणामुळे खिलाडी कुमारच्या वैयक्तिक आयुष्यात बरीच उलथापालथ झाली होती हेच यावरुन स्पष्ट होते आहे. दोघांमध्ये या कारणावरून जोरदार भांडण झाले.
त्यानंतर ट्विंकलची समजूत काढून अक्षय तिथून तिला घरी घेऊन गेला आणि तिला वचन दिले की यापुढे तो प्रियांकासोबत कधीच काम करणार नाही. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार प्रियांका कतरिना आणि सोनाक्षी यांच्यासोबत सतत काम केल्यानंतर अक्षयने आता अभिनेत्रींची निवड बदलली असून तो आता पुढील चित्रपटात वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत काम करताना दिसत आहे.
चित्रपटांमध्ये सतत त्याच ओळखीच्या अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर करण्यापेक्षा नव्या चेहऱ्यांसोबत काम करण्याच्या त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना नव्या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्रीही पाहता येते. त्याचा एक फायदा असाही आहे, की आता कोणत्याही अभिनेत्रीसोबत अक्षयचे नावही जोडले जात नाहीये. त्यामुळे त्याने घेतलेल्या या निर्णयाचा त्याला नक्कीच खूप फायदा झाला आहे.