Breaking News

जेव्हा निर्माता महेश भट्टने ह्या अभिनेत्रीला फेकून मारली होती चप्पल, रात्र भर रडत होती अभिनेत्री!

बॉलिवूडमध्ये स्थान मिळविणे सोपे नाही हे स्वप्न घेऊन दररोज किती लोक मुंबईत येत असले तरी आणि रात्रीच्या वेळी हे स्वप्न तुटले जाते. कारण बॉलिवूडमध्ये आपली वाटचाल करणे इतके सोपे झाले असते तर आज प्रत्येकजन सुपर स्टार बनले असते.

प्रत्येकजन मोठ्या स्वप्नाद्वारे बॉलिवूडकडे वळत असतात. जेव्हा बॉलिवूडमध्ये संघर्ष करणाऱ्या लोकांनी बॉलिवूडच्या सत्याची माहिती बऱ्याचदा उघड केली तेव्हा लोकांना असा विचार करण्यास भाग पाडले की त्या व्यक्तीचे काय झाले असेल.

बॉलिवूडमधील बर्‍याचदा बॉलिवूड कलाकार आणि अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये बर्‍याच चांगल्या वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. आज आम्ही आपल्याला चित्रपटांबद्दल नेहमीच चर्चेत असणारी कंगना रानौत बद्दल सांगणार आहोत. तिने प्रत्येकवेळी केलेली विधाने कायम चर्चेत आहेत आणि बॉलिवूड ची पोल खोल देखील बऱ्याचदा केली आहे.

ही कहाणी कंगनाच्या बहिणी रांगोळीनेही ट्विटरच्या माध्यमातून खूप पूर्वी शेअर केली होती. ही कहाणी महेश भट्टशीही सं-बंधित आहे. रांगोळीने सांगितले होते की महेश भट्टने एकदा चप्पल फेकून कंगनाला मारले होते. या घटनेनंतर कंगनाचे काय झाले हेही तिने सांगितले होते.रांगोळीने यापूर्वी १९ वर्षीय कंगनावर महेश भट्टचा राग कसा ओढवला गेला याबद्दल एका ट्विटद्वारे ही घटना उघडकीस आणली होती.

काही काळापूर्वी कंगनाने आलियावर खूप बोलले होते त्यानंतर आलियानेही कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्याचवेळी आलियाची आई सोनी रझदान यांनीही आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहिले आहे की कंगनाला महेश भट्टने बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता. यानंतर रांगोळीने सोनी यांना टैग करून म्हणले की महेश भट्टने कंगनाला ब्रेक दिला नाही तर अनुराग बासूने तिला ब्रेक दिला. या ट्विटनंतर आलिया आणि तिच्या आईने उत्तर न देणे योग्य वाटले. कंगनाला ब्रेक कोणी दिला दोन्ही कुटुंबे वेगवेगळे दावे करत आहेत.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार हा किस्सा तेव्हांचा जेव्हा वो लम्हे चे प्रिव्यू पाहण्यासाठी कंगना रनौत थिएटरमध्ये पोहोचली आणि महेश भटने कंगनाला येथे चप्पल फेकून मारली. त्याने स्वत: चा चित्रपट पाहण्यापासून कंगनाला रोखलं. कंगना रात्रभर रडत राहिली. हे रांगोळीने स्वतः सांगितले होते.

महेश भट्ट यांनी देखील रांगोळी च्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे ते म्हणाले की कंगना तर अजून लहान आहे. इंडस्ट्रीतील तिने तिचा प्रवास आमच्यासोबत सुरू केला होता. आता फक्त तिच्या कुटुंबातील एक व्यक्ती माझ्यावर आरोप करत आहे म्हणून मी त्यावर काही बोलणे चुकीचं ठरेल. आपल्या मुला-मुलींकडे बोट दाखवून काही उलट बोलणं आपली संस्कृती शिकवत नाही. त्यामुळे मी काही बोलणं शक्यच नाही. हा माझा स्वभाव नाही असे ते म्हणाले.

अनुराग बासू दिग्दर्शित गँगस्टर या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाचे निर्माते महेश भट्ट आणि त्यांचे बंधू मुकेश भट्ट होते. ज्या चित्रपटातून कंगनाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्या चित्रपटामध्ये महेश भट्ट केवळ क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होते. इतकेच नाही तर महेश भट्ट यांनी कंगनाला धोखा चित्रपटासाठी विचारले होते. मात्र या चित्रपटासाठी तिने नकार दिल्यानंतर महेश भट्ट यांनी कंगनाला बरंच काही खरं-खोटं सुनावले होते.

अभिनेत्री कंगना व पूजा भट्ट यांच्यातील भांडण सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून या दोघींमध्ये ट्विटरवॉर रंगला आहे. आता पूजाने कंगनाचा जुना व्हिडीओ शेअर करत तिच्यावर पलटवार केला आहे. हा व्हिडीओ एका पुरस्कार सोहळ्यातील असून यामध्ये कंगना मुकेश भट्ट व महेश भट्ट यांचे आभार मानताना दिसली होती.

About admin

Check Also

ए’म’ए’मए’स कांडवर रडणारी अंजलीने एका रशियन पुरुषासोबत वेळ घालवण्यासाठी मागितले होते पाच हजार रुपये, जाणून व्हाल थक्क!

सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे,जिथे क्षणाक्षणाला नवीन गोष्टी अपलोड होत असतात. अनेक फोटो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *