चित्रपटामध्ये प्रसिद्ध परंतु अभ्यासात फ्लॉप आहेत ह्या अभिनेत्र्या, एकीने तर फक्त पाचवी पर्यंत केले आहे शिक्षण …

Bollywood Entertenment

बॉलीवूडमधील अभिनेत्रींचे सौन्दर्य आणि त्यांचा अभिनय यांचे लाखो चाहते आहेत. पण बॉलीवूडमध्ये  यशस्वी होण्यासाठी जितके सौंदर्य महत्वाचे आहे, तितकेच शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, की बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या खूप यशस्वी तर आहेत पण त्यांचे हे यश पाहता त्या फारच कमी शिकेलल्या आहेत याचा अंदाज तुम्हाला येणार नाही.

आज आम्ही तुम्हाला अशा काही बॉलीवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या सौंदर्‍याच्या व अभिनयाच्या बळावर बॉलीवूडमध्ये नाव कमावले आहे व आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, पण शिक्षणाच्या बाबतीत त्यानी फार कमी शिक्षण घेतले आहे. चला तर मग बघूया कोण आहेत त्या अभिनेत्री.

सोनम कपूर:- सोनम कपूर अशीच एक सुप्रसिद्ध अभिनेत्री, जिने या क्षेत्रात प्रसिद्धी मिळविली आहे. प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी. ती खरे तर खासकरून तिच्या फॅशन सेन्स आणि स्टायलिश स्टाईलसाठी ओळखली जाते. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, की सोनम कपूरने फक्त १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.  त्यानंतर तिने शिक्षण सोडून देऊन अभिनय क्षेत्रात आपले करियर करायला सुरुवात केली.

आलिया भट्ट:- आलिया भट्ट ही प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आहे हे आपल्याला माहीतच आहे. तिने या फिल्मी जगात खूप लहान वयात सौंदर्याने आणि अभिनयातून लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. ही अशी सुंदर आणि गोड दिसणारी आलिया भट्ट शिक्षणात मात्र कमी पडली आहे. तिने फक्त १२वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. पण तिच्या कारकीर्दीत मात्र तिने बरेच यश संपादन केले आहे.

करिश्मा कपूर:- करिश्मा कपूर ही बॉलीवूडमधील नावाजलेली व खूप प्रसिद्ध अभिनेत्री होती. आजही तिचा चाहतावर्ग कोटीच्या घरात आहे. पण जर शिक्षणाबद्दल बोलायचे झाले, तर मात्र अभ्यासामध्ये ती खूपच कमकुवत होती आणि तिचे शिक्षण फक्त ५वी पर्यंतच झाले आहे.

कंगना रनौत:- सुंदर त्याचबरोबर बोल्ड अभिनेत्री अशी कंगनाची बॉलीवूडमधील ओळख आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर जबरदस्त यश संपादन केले आहे, परंतु शिक्षणात मात्र ती कमी पडली. तिने तिचे १२वी सुद्धहा पूर्ण केलेले नाही.

जेव्हा ती बारावीत नापास झाली तेव्हा मात्र तिने शिक्षणाला रामराम ठोकला आणि अभिनयाची आवड पूर्ण करण्यासाठी बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत पाऊल ठेवले. तिने या क्षेत्रात खूप प्रसिद्धी मिळविली आणि आज तिचे असंख्य चाहते आहेत व एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. ती इतकी कमी शिक्षित आहे असे कुणाला वाटणार नाही.

दीपिका पादुकोण:- बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या बायोग्राफी लॉन्‍चच्या दरम्यान म्हणजेच २०१७ साली, दीपिका पादुकोणने हिंदुस्तान टाईम्सला मुलाखत दिली होती व सांगितले होते की ती कधीही महाविद्यालयात गेलेली नाही. तिने सांगितले, की अकरावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर कॉलेजमध्ये मी गेलेच नाही तर त्यावेळी मी एक यशस्वी मॉडेल बनले होते.

ती म्हणते, मी माझ्या गावात राहात असे आणि मला नेहमी मुंबई व दिल्लीचा प्रवास करावा लागत असे, त्यामुळे मला अभ्यासाकडे पुर्णपणे लक्षच देता आले नाही. मी महाविद्यालयात प्रवेश तर घेतला पण पदवी परीक्षा देऊ न शकल्यामुळे मी माझी पदवी पूर्ण करू शकले  नाही. मी डिस्टन्स लर्निंगचा प्रयत्न केला पण तोदेखील सफल झाला नाही. मी फक्त १२ वी पास आहे, त्यामुळे माझे पालक माझ्यावर नाखुष होते.

माधुरी दीक्षित:- माधुरी दिक्षित बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिने १९८४ मध्ये अबोध या चित्रपटापासून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. अनुपम खेर यांच्या २०१५ मधील चॅट शो मध्ये  माधुरी दीक्षितने आपल्या शिक्षणाबद्दल सांगितले होते.

ती म्हणाली होती की लहानपणी “मायक्रोबायोलॉजिस्ट” होण्याची तिची इच्छा होती. तिचे शिक्षण दिव्य चाईल्ड हायस्कूलमधून झाले व  तिने मुंबईतील साठये महाविद्यालयातून मायक्रोबायोलॉजी विषयात बी.एस.सी करायला सुरुवात केली परंतु त्यानंतरच तिला चित्रपटाची ऑफर मिळाली. मग माधुरीने चित्रपट क्षेत्रात करिअर करण्यासाठी सहा महिन्याच्या कालावधीत महाविद्यालय सोडले.