गौतमी पाटील नव्या अंदाजात ,अत्ता पर्यंत तुम्ही गौतमीचा असा अंदाज तुम्ही कधीच बघितला नसेल ,क्लि’क करून व्हिडो पहा ..

Bollywood Entertenment

आपल्या लावणीने आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावणारी गौतमी पुन्हा एकदा तिच्या नव्या लावणीमुळे प्रसिद्धी झोतात आली आहे. तिच्या लावणीवर अनेकजण फिदा आहेत. आता गौतमी लवकरच एक अल्बम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गौतमी पाटील ही सातत्याने चर्चेत आहे. तिच्या लावणीचा वाद चांगलाच गाजला होता. त्यानंतर गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यात चर्चेतील नाव ठरलं आहे. गौतमी पाटील ही एका पंजाबी गाण्यात झळकली आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे.

गौतमी पाटील ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच गौतमी पाटीलने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या गाण्याची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे.

‘तेरा पता’ असे तिच्या गाण्याचे नाव आहे. तिचे हे गाणे पंजाबी भाषेतील आहे. तिच्या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मराठीत लोकप्रियता मिळवल्यानंतर पंजाबी गाण्यांमध्ये देखील गौतमी चमकताना दिसत आहे.

गौतमीच्या या नव्या गाण्यावर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर काही जण तिच्या या गाण्यातील पेहरावावरुन तिला ट्रोल करताना दिसत आहे. येत्या काळात गौतमी एका चित्रपटात दिसणार आहे, असे बोललं जात आहे.

दरम्यान गौतमीने पहिल्यांदा अकलूज येथील लावणी महोत्सवात बॅक आर्टिस्ट म्हणून गौतमीने सादरीकरण केले होते. पहिल्यांदा लावणी केल्यावर गौतमीला ५०० रुपये मानधन मिळाले होते आता आपण शो साठी हजारो रुपयांचे मानधन घेत असल्याचे गौतमीने मागे एका कार्यक्रमात सांगितले होते.

महाराष्ट्रात अनेक राजकीय लोक गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. जेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गौतमीला बोलवण्याचा प्रकार अजित पवार यांच्या कानी पडला तेव्हा त्यांनी संताप व्यक्त केला होता. याविषयी मत मांडताना अजित पवार म्हणाले होते की, ‘लावणी ही महाराष्ट्राची परंपरा आहे पण लावण्यांच्या नावाखाली अश्लिलता होता कामा नये. काही जिल्ह्यात लावण्यांना बंदी आहे. याची सविस्तर माहिती मी घेणार आहे. आपली परंपरा टिकली पाहिजे. त्याला कुणी चुकीचा पायंडा पाडत असेल त्यावर मी अधिवेशनात तो मुद्दा मांडेन.’

त्यानंतर गौतमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली होती. लोकांनी माझ्याकडून झालेल्या चुका लक्षात आणून दिल्यानंतर मी त्या सर्व चुका सुधारलेल्या आहेत. त्यानंतर कोणत्याही कार्यक्रमात मी अश्लिल डान्स किंवा हातभाव केलेले नाहीत. परंतु तरीदेखील माझ्याकडून काही चुकलं असेल तर दादा मला माफ करा, असं म्हणत गौतमी पाटीलने म्हटले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neeraj Goyat (@neeraj_goyat)