काळ्या साडीमध्ये टीनाला बघून तिच्या प्रेमात वेडे झाले उद्योगपती अनिल अंबानी, वडील धीरुभाई यांनी केला विरोध तरीही केले लग्न..

Bollywood

तुम्हाला माहीतच आहे रिलायन्स संस्था हे नाव किती मोठे आहे. रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांना दोन मुलगे मोठा मुकेश आणि छोटा अनिल. धिरूभाईंचा छोटा मुलगा अनिल अंबानी यांचे वय आता ६१ वर्ष आहे.

अनिल अंबानी यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री टीना मुनिम हिच्याबरोबर विवाह केला आहे. या दोघांचा प्रेमविवाह आहे आणि तो एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा वेगळा नाही. चला तर मग जाणून घेऊया या खास प्रसंगी अनिल अंबानी आणि टीना यांच्या आगळ्या वेगळ्या प्रेमकहाणीबद्दल-

पहिली भेट एका लग्नसमारंभात:- अनिल अंबानी यांनी १९८६ मध्ये झालेल्या एका लग्न समारंभात टीना मुनीम यांना प्रथम पाहिले. त्या लग्न समारंभात अनिल यांची नजर टिनावरुन बाजूला झालीच नाही कारण टीना संपूर्ण पार्टीत एकच अशी स्त्री होती.

जिने काळ्या रंगाची साडी नसेली होती व त्या साडीत ती खूपच सुंदर व आकर्षक दिसत होती. त्यांची प्रथम भेट घडवून आणली टीना यांचे पुतणे करण यांनी. त्यावेळी टीना मुनीम ही चित्रपटसृष्टीतली एक नावाजलेली अभिनेत्री होती आणि त्याचवेळी रिलायन्स कंपनीचा उदय होत होता.   टीना म्हणतात की त्यांना पहिल्या भेटीत अनिल आवडले होते.

दुसरी भेट झाली ती थेट अमेरिकेत:- अनिल आणि टीना यांची दुसरी भेट अमेरिकेत झाली होती. ती भेट अगदी सर्वसामान्य गोष्ट होती, कारण टीनाला ही भेट नकोच होती, कारण तिच्यासाठी अनिल हे एक अनोळखी व्यक्ति होते. परंतु अनिलच्या आग्रहामुळे व हट्टीपणामुळे ती त्यांना भेटायला गेली आणि त्या भेटीत टीना व अनिल अंबानी एकमेकांच्या जास्त जवळ आले.

अनिल त्यांना आवडला तर होता पण त्यांना थोडा वेळ हवा होता. त्यानंतर या दोघांनी खूप कालावधी  एकमेकांना डेट करण्याचे व समजून घेण्याचे चालू ठेवले. त्या दरम्यान टीना मुनिम बॉलिवूडपासून थोडी दूर गेली.

घरच्यांचा विरोध: जेव्हा अनिल अंबानी यांनी टीना मुनिम ही एक अभिनेत्री आहे याबद्दल आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगितले तेव्हा त्यांच्या कुटुंबाला कोणतीही अभिनेत्री अंबानी कुटुंबाची सून व्हायला नको होती आणि याच कारणामुळे कुटुंबातील सदस्यांनी त्यांना विरोध दर्शवला.

पण अनिलने निर्णय घेतला होता. त्याने स्वत: कुटुंबापासून दूर रहाण्याचा निर्णय घेतला. मीडियाच्या  रिपोर्टप्रमाणे नंतर अनिलने ही गोष्ट टीनाला सांगितली. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या निर्णयाबद्दल टीनाला सांगितले पण तिने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.  जरी तिला धक्का बसला होता तरी टीना त्यावेळी बॉलिवूड सोडून अमेरिकेत इंटिरियर डिझायनिंगच्या कोर्ससाठी निघून गेली.

क्लाइमेक्स काही वेगळाच होता: या प्रेमकथेच्या सुरूवातीला दुसरे काहीतरी लिहिले असले तरी १९८९ मध्ये अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे खूप मोठा भूकंप झाला होता आणि त्याचवेळी टीना अमेरिकेत होती. अनिल अंबानी यांनी कुठून तरी तिचा नंबर शोधला आणि टीनाला फोन केला फक्त ती ठीक आहे का असे विचारण्यासाठी.

पण त्या प्रश्नाला त्याना हो उत्तर मिळाले व बाकी काहीच न बोलता त्याने फोन ठेवून दिला. अनिलच्या या वागण्याने मात्र टिनाला खूप आश्चर्य वाटले. खरे तर तीसुद्धा त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती आणि विलंब न करता तिने त्याला फोन केला.  त्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले व बर्‍याच विचारांती अनिल अंबानी यांनी आपल्या वडिलांना स्पष्ट सांगितले की मी या मुलीशी लग्न करणार आहे.

शेवटी, अनिल यांना घरातील सदस्यांना पटवून देण्यात यश मिळाले  व दोघांनी १९९१ मध्ये लग्न केले. त्यांना जय अनमोल आणि जय अंशुल अशी दोन मुले आहेत. रियालन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे त्यावेळी धनाढय़ उद्योगपती होते.

मात्र भारतातील दूरसंचार बाजारपेठेत खूपच मोठ्या प्रमाणात उलथापालथ व अनर्थपूर्ण घडामोडी घडल्याने अनिल अंबानी आता धनाढय़ राहिले नाहीत असे त्यांच्या वकिलांनी शुक्रवारी ब्रिटनमधील न्या यालयात स्पष्ट केले.

चीनमधील काही नामांकित व अग्रगण्य बँकांनी अनिल अंबानी यांच्याकडून ६८० दशलक्ष डॉलर रक्कम वसूल करण्यासाठी आता न्या यालयात धाव घेतली आहे असे त्याबाबतच्या सु नावणीच्या वेळी वकिलांनी ही बाब न्या यालयात स्पष्ट केली.