कसकाय १ वर्षामध्ये 3 मुलांची आई बनली आहे सनी लियोनी- अत्ताच जाणून घ्या …

Bollywood

पॉर्नफिल्म्सना अलविदा करत बॉलिवूडमध्ये कमी काळात जम बसविलेली अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. सौंदर्य आणि नृत्यकौशल्याच्या बळावर तिने इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान भक्कम केले आहे. विशेष म्हणजे तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आज सनी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

चित्रपटांमध्ये आयटम गर्ल म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुंदर अभिनेत्री सनी लिओनीच्या आयुष्यात बरेच चढउतार होते. असे असले तरी तिने आज प्रत्येक अडचणीला तोंड देत बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने बॉलिवूडमध्ये हे स्थान तिने प्राप्त केले आहे.

तसे सनी लिओनी आज चित्रपटांमध्ये तिच्या बोल्ड सीन्स साठी ओळखली जाते आणि तिने आतापर्यंत बर्‍याच चित्रपटांमध्येही काम केले आहे.पण आज सनी लिऑन चित्रपटात काम करण्याबरोबरच आपले विवाहित जीवन देखील व्यतीत करत आहे. सनीने 2011 मध्ये यूएसएहून असलेल्या डॅनियल वेबरशी लग्न केले होते.

मात्र आतापर्यत सनीने तिच्या गर्भापासूनच एका देखील मुलाला जन्म दिला नाही. तरीही आज ती तीन मुलांची आई आहे. सनीने महाराष्ट्रातील निशा या मुलीला दत्तक घेतले आहे. काही महिन्यांआधी सरोगेसीच्या माध्यमातून सनी पुन्हा दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे त्यांची नावे अशर आणि नोह अशी आहेत. यामुळे सनी लिओनी तीन मुलांची आई बनली आहे.

आम्ही सांगतो की कोरोना विषाणू आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सनी लिओनी सध्या लॉस एंजेलिसमध्ये तिचा नवरा डॅनियल वेबर आणि मुले नोहा अशर निशासमवेत आहे. सनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि या मोकळ्या वेळात ती तीचे फोटो शेअर करत असते.

पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने आपला मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली. बेबी डॉल या आयटम साँगने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर तिचं आयुष्यच बदलले होते.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत असताना इंटिमेट सीन देणे किती कठीण असते हे तिने सांगितले. जवळपास ५० लोकांच्या नजरा तुमच्यावर असतात असे ती म्हणाली. इंटिमेट सीन देणं हे अत्यंत लाजिरवाणी काम असते. हे सीन शूट करताना तुमच्या आसपास १०० लोकांचा वावर असतो. त्यातील ५० लोकांच्या नजरा तर कायम तुमच्यावर रोखून असतात. त्यामुळे इंटिमेट सीन देणे हे अत्यंत कठीण काम असते.

त्यातही बिग बॉसच्या पाचव्या सिझन मध्ये तिने सहभाग घेतला. यावेळी खऱ्या आयुष्यात सनी कशी आहे हे प्रेक्षकांना समजले होते. आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण देणाऱ्या सनीच्या संपत्तीचा आकडा पाहून तुम्ही चकीत व्हाल.

एका इंग्रजी मासिकेने दिलेल्या माहितीनुसार सनीचा मुंबईतील बंगला अमेरिकेतील फ्लॅट महागड्या गाड्या हे सर्व मिळून एकूण ९७ कोटींची ती मालकीण आहे. काही वर्षांपूर्वीच सनीने अमेरिकेत फ्लॅट विकत घेतला. त्याची किंमत ३० कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जातं. तर मुंबईतील तिच्या बंगल्याची किंमत ३ कोटी इतकी आहे.

गेल्यावर्षी सनी लिओनी मराठी चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा होती. सुजय डहाकेच्या वल्गर एक्टिव्हिटीज इन्कॉर्प या चित्रपटात ती काम करणार होती. मात्र या चित्रपटाबद्दल अद्याप कोणत्याही हालचाली झालेल्या दिसत नाही. असो पण तरीही सनी मराठमोळ्या लूकमध्ये दिसणार आहे.