बॉलिवूडचे हॉ’ट कपल करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे नेहमीच खूप चर्चेत असतात. करीना कपूरला बॉलिवूड इंडस्ट्रीतील बिंदास अभिनेत्री पैकी एक मानली जाते. तिला जे आवडते, ते ती मोकळे सांगत असते.
करीना कपूर खानने तिच्या ‘स्टार व्हर्सेस फूड’ शोच्या ट्रेलरदरम्यान तिच्या बेडवर तीन गोष्टी उपलब्ध पाहिजे हे रहस्य उघडे केले आहे. बॉलीवूड पॉवर कपल सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते आणि त्यांच्याबद्दलच्या प्रत्येक अपडेटला ते नेहमी फॉलो करतात.
स्टार व्हीएस फूड या सेलिब्रिटी कुकिंग शोच्या शूटिंगदरम्यान, करिनाने तिची मैत्रिण तान्या घावरीसोबत खास बातचीत केली होती , तिने असे सांगितले होते की, ‘मला बेड लेव्हलवर तीन गोष्टी हव्या आहेत, शर्बची बाटली’, पायजमा आणि पती सैफ अली खानचे हे उत्तर ऐकून.
करीना, सेटवर उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले होते. इतकंच नाही तर करीना पुढे असे म्हणाली आहे की, ‘मला वाटतं यापेक्षा चांगलं उत्तर असू शकत नाही. यासाठी मला पुरस्कार मिळायला हवा.
करीना कपूरने याआधी दुसर्या एका मुलाखतीदरम्यान असे सांगितले होते की, जेव्हा ती सैफला भेटली तेव्हा तिच्या मनात एक संपूर्ण फिल्मी भावना होती, जसे की मी हूं, सुष्मिता सेन नाही, जसे की ती आली तेव्हा बॅकग्राउंडमध्ये एक रो’मँटिक गाणे वाजायचे. आणि तिच्या साडीचा पदर अगदी तसाच उडत राहील.
करीना कपूरने एकदा पती-पत्नीच्या भांडणाबद्दलही सांगितले होते की, जेव्हाही तिचे सैफसोबत भांडण होते तेव्हा ती सॉरी म्हणते. कारण त्यांना वाटते की फक्त पुरुषच चुका करतात, म्हणूनच त्यांनी नेहमी सॉरी म्हणायला पाहिजे.
सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे २०१२ साली लग्न झाले होते. करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता हे दोघेही दोन मुलांचे आई-वडील झाले आहेत.
‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले होते. या चित्रपटात दोघेही एकमेकांच्या वि’रोधात दिसले होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी खऱ्या आयुष्यात सैफ अली खान आणि करीना कपूरची जोडी हिट ठरली.
अभिनेत्री करीना कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लाल सिंग चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, सैफ अली खानची तांडव ही वेब सीरिज काही महिन्यांपूर्वी रिलीज झाली होती, जी लोकांना खूप आवडली होती.