करिना कपूरचा स्वतःचा रेडिओ शो व्हाट वूमेन वांट आहे याचे सर्व भाग खूप इंटरेस्टिंग आहेत आणि प्रत्येक नवीन एपिसोड आपल्यासोबत एक नवीन खुलासा घेऊन येत असतो. करीना कपूरचा नवीन एपिसोड येताच तो त्वरित व्हायरल होतो. करिनाचे काही इंटरेस्टिंग प्रश्न आणि तिथल्या सेलिब्रिटींच्या हसतमुख उत्तरांमुळे असे वातावरण तयार झाले असते आणि या एपिसोड मध्ये कोणाला माहिती नसलेले रहस्य देखील बाहेर पडत असतात.
काही दिवसांपूर्वीच करीनाची सावत्र मुलगी सारा अली खान करीनाच्या या शोचा एक भाग बनली होती. तिच्या लव्ह आज तक 2 या चित्रपटाच्या प्रमोशनच्या संदर्भात साराने तिच्या सावत्र आई करीनाच्या शोमध्ये चांगला वेळ घालवला. हिं दुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार शोच्या वेळी करीनाने साराला असा एक मजेशीर प्रश्न विचारला होता की तू कधी खोडकर मेसेज कोणाला पाठवले आहेत का?
यासह करिना देखील म्हणाली खरे तर मला हे विचारण्याची इच्छा नव्हती कारण तुझ्या वडिलांनि हा एपिसोड बघितला तर काय. थोड्याशा पेचानंतर साराने उत्तराशी सहमत केले. अगदी ठीक होते पण काही इतर प्रश्नांनंतर करीनाने साराला एक अतिशय अवघड प्रश्न विचारला.
करिना दुसरा प्रश्न विचारताना म्हणाली मी हा प्रश्न विचारू नये परंतु तू जाणतेस की आपण आता आधुनिक लोक आहोत. तू कधी वन नाईट स्टँड केला आहे का?. वन नाईट स्टँड म्हणजे एखाद्या मुलाबरोबर एकरात्री सं-बंध ठेवणे. साराचे उत्तर काय असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता का. चला तर जाणून घ्या यावर सारा काय म्हणाली.
सारा उत्तर देते की कधीच नाही. साराच्या उत्तरानंतर करिनाने सुटकेचा श्वास घेतला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कार्तिक-साराचा लव्ह आजकाल 2 14 फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला रिलीज झाला होता.
अभिनेत्री करीना कपूरला इंडस्ट्रीतील सर्व गुपित गोष्टी माहित असतात aसे म्हणतात. कोण कोणाला डेट करत आहे, कोणामध्ये भांडणं सुरु आहेत याची प्रत्येक बातमी करीनाला माहित असते. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानच्या अफेअरविषयी तिला काय माहित आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एका मुलाखतीत केला गेला होता. त्यावर करीनाने मजेशीर उत्तर दिले.
पिंकविला या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत करीनाला सारा आणि कार्तिक आर्यन यांच्या अफेअरच्या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे असा प्रश्न विचारला गेला. त्यावर ती सुरुवातीला म्हणाली मला खरेच त्याविषयी माहित नाही कारण दोघांनीही मला काहीच सांगितले नाही.
सारा आणि कार्तिक बऱ्याचदा एकत्र दिसत असतात पण त्यांनी अजूनही रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली प्रसारमाध्यमांना दिली नाही. हे दोघे लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. चित्रपटात या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत.
करीनासोबत असताना मला कधीही संकोचपणा वाटला नाही असे साराने करिअरच्या सुरुवातीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. करीना माझी सावत्र आई आहे हे मला वडिलांनीच सांगितले होते. पण करीनाला माझी चांगली मैत्रीण व्हायचं आहे तिने हे फार पूर्वीच मला सांगितलं होतं. ती सावत्र आई असली तरी मी तिला छोटी आई म्हणून कधीही हाक मारणार नाही तिला ते अजिबातच आवडणार नाही असंही सारा गंमतीने म्हणाली होती.
करीनानेही साराला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी मदत केली होती. सारासोबत चांगली मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करीनाने नेहमीच केला आहे. त्यामुळे सारासुद्धा करीना आणि तैमुरसोबत आनंदाने वागताना दिसते.