आमिर खान अर्थातचं बॉलीवुडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट ज्याला म्हटलं जातं. तर असा हा आमिर खान गेल्या वर्षभरात बराच काळ चर्चेचा विषय बनून राहिला होता. त्याला महत्वाची दोन कारणं म्हटली तर त्यापैकी एक म्हणजे घटस्फोट आणि दुसरी म्हणजे त्याचा नवा येणारा सिनेमा. मुळात बॉलिवुडमधे अनेक सिनेमे येतात जातात, काही वेळा कलाकारांचही असं होतं, पण काही गोष्टी बॉलिवुडमधील अशा असतात ज्या प्रत्येक रसिकप्रेक्षकांच्या मनात कायमच घर करून जातात.
मुळात ३ इडियट्स या सिनेमाने अगदी तमाम रसिकप्रेक्षकवर्ग हादरवून सोडला. या सिनेमातील संवाद, प्रसंग, कथानकातील पात्रे, साऱ्याच गोष्टी अगदी लोकांच्या डोक्यात फिट्ट बसून राहिल्या असा हा सिनेमा होता. या सिनेमातला रॅन्चो अर्थात आमिर तर प्रत्येकाला लक्षात राहतोच त्याखेरीज इतरही खास पात्रे आपल्या लक्षात राहतात. शिवाय आमिर खान याकरता स्पेशल वाटतो कारण तो नेहमीच त्याच्या सिनेमातून हटके गोष्टी आपल्यासमोर घेऊन येताना पहायला मिळतो.
केवळ 3 इडियट्सच नाही तर त्याखेरीज दंगल असो, पीके, सिक्रेट सुपरस्टार वा तारे जमिन पर आमिर खान आणि त्याचे सिनेमे अगदी भारतीय प्रेक्षकांवर कटाक्षाने काही गोष्टींच्या अज्ञानावर एक जबरदस्त प्रकाश टाकून जातात. तुम्ही म्हणालं हा विषय असा अचानक पुन्हा का? तर आज आपल्याला याच आमिरबद्दल थोडीशी चर्चा करायची आहे. त्याला कारणदेखील तसचं आहे. आमिरने नुकतचं त्याच्या किरण राव या पत्नीशी घेतलेल्या घट-स्फोटावरती आता मौन सोडत त्यावर भाष्य केल्याचं पहायला मिळतं आहे.
अभिनेता आमिर खान हे नाव जरी घेतलं तरी आपल्या डोळ्यांसमोर काही खास गोष्टी उभ्या राहतात. त्या म्हणजे प्रसिद्धी, त्याची वैयक्तिक कामाबद्दलची प्रेरणा, मेहनत आणि बरचं काही. शिवाय सोबतच त्याला गेल्या १५ वर्षांपासून साथ देत आलेली त्याची पत्नी किरण राव. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, किरण राव आणि आमिर यांनी आत्ता गेल्या काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेण्याची घोषणा केली. परंतु त्यावर प्रतिक्रिया देणं हे आमिर व किरण या दोघांनीही टाळलं होतं.
परंतु आता आमिरने पुढाकार घेत यावर भाष्य केल्याने सर्वांचे डोळे आमिरच्या बोलण्याकडे लागल्याचे दिसून आले. आमिरने फार स्पष्ट खुलासा करत सांगितले की, सोशल मीडियावर ज्या अफवा पसरल्या गेल्या आमिर व फातिमा यांच्या पुढील अफेयर्सच्या त्या सपशेल चुकीच्या होत्या. आमिरचं कोणासोबतही प्रेम नाही. किरण राव हिच्यावरच आमिर अजूनही प्रेम करतो आहे. आणि करत राहणार. फरक इतकाचं की, लग्नाचं नातं आणि ते बंधन दोघांमधे नसेल.
त्याला कारण म्हणजे, किरण रावला वाटलं की आमिर सध्या स्वत:मधेच हलवलेला व्यक्ती असतो. तो कुटूंबाला वा कुणालाही हवा तो वेळ देऊ शकत नाही. आणि आमिर ते ऐकून तिच्याकरता स्वत:ला नव्याने जगायला सुरूवात करू इच्छितही होता परंतु किरण रावने त्या गोष्टींना नकार दिला. ती म्हणते की, आमिर जसा होता आणि आहे तसाच तो तिला आवडतो. त्याने स्वत:ला बदलू नये. आमिर खान हा खुलासा करताना फारच भावूक झाला होता.
तो हेदेखील म्हटला की, मी कोणतचं नातं निटकेपणाने निभाऊ शकलो नाही. मला माझ्यातला कलाकार जपताना माणसं फारशी जपता आली नाहीत त्यांना हवा तो वेळ देऊ शकलो नाही. असं म्हणतं आमिर अगदीच भावनात्मक होऊन गेल्याच पहायला मिळालं. आमिर या गोष्टीला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चुक मानतो.
तर मंडळी आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाच्या निर्णयावर तुमचं काय मत आहे? आमिरने जी चुक कबूल केली ती कलाक्षेत्रात बऱ्याचदा घडते याची उदाहरण आपण पाहतो, त्यावर काय वाटतं? आमिरच्या प्रामाणिक कबुलीने त्याच्या जवळची माणसे त्याला तितकीच प्रेमाची मानत असतील का? आयुष्य जगताना नात्यांना वेळ देणं यावर तुमचं काय मत आहे? आपली उत्तरे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. धन्यवाद