आपल्या वयापेक्षा २० वर्षानी लहान असलेल्या ह्या अभिनेत्रीवर जडला सलमानचा जीव, करणार आहे लग्न? ….

Entertenment

जगातील सगळ्यात भव्य असा रियालिटी शो बिग बॉस नेहमीच चर्चेत असतो. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक दिवस काही ना काही कारणासाठी चर्चेत राहिला आहे. या शोबद्दल प्रेक्षक पण खूप उत्साही असतात.

खरे तर रविवारी सलमानने सर्व स्पर्धकांना ते जनतेचे मनोरंजन कसे करतात याबद्दल विचारले आणि त्यावर विनोदही केला. इतकेच नव्हे तर सलमान खान सिद्धार्थ शुक्ला आणि हिना खान यांच्या लग्नाबद्दलही बोलला होता.

सिद्धार्थबद्दल बोलताना सलमान म्हणाला, की आता सिद्धार्थपण विवाह करणार आहे. हे ऐकून सगळेच थक्क झाले. यावर हिना खानने ती मुलगी कोण आहे असा प्रश्न विचारला.

यावर सलमान म्हणाला, मी सिद्धार्थ गर्ल चाइल्ड शोच्या लग्नाबद्दल बोलत होतो. तर हिनाने “सर सर” नवीन कपडे घालून आम्ही पार्टीत जाण्यासाठी उत्सुक होतो असे म्हणत नाराजी व्यक्त केली. हिनाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर सलमानने हिनाला प्रश्न विचारला, तुझे लग्न आहे काय?

यावर हिना खानने सलमान खानकडे नजरफेक करत उत्तर दिले, सर, तुम्ही जर त्याठिकाणी नवरदेव म्हणून असाल तर, हे ऐकून सलमान खान हसला. सलमानने हिनाला प्रत्युत्तर देताना सांगितले की माझ्या लग्नाची वेळ निघून गेली आहे, मला आता लग्न करायचे नाही.

२०२० सालच्या बिग बॉस मध्ये खूप इंटरेस्टिंग आवडणारे टास्क होते. यावरून अंदाज बांधता येतो की हा बिग बॉस सीझन १४ किती जबरदस्त असतो. बिग बॉस हा कार्यक्रम सोशल मीडियावर देखील खूप लोकप्रिय आहे. सलमान खान या एपिसोडच्या सुरुवातीच्या भागात घरात एक सुपरमार्केट उघडले आहे असे घोषित करतो.

शिवाय, या सुपरमार्केटच्या मॅनेजरचे काम हीना खान बघणार आहे, असेही सांगतो. हीनाने घरात प्रवेश केल्यावर ती प्रत्येक सदस्याला स्टोअर रूममधील सुपरमार्केटमध्ये बोलावते आणि घरातील शिधा सामान भरण्यासाठी पदार्थ किंवा आई, भाऊ, मैत्रीणी यांना पाठवलेला संदेश असा पर्याय देते. त्यामुळे या टास्कमध्ये प्रत्येक सदस्य पोटाची भूक आणि घरच्यांची पत्र, संदेश यांच्यापैकी काय निवडणार हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सध्या हीना खान तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. “ये रिश्ता क्या कहलाता है” “कसोटी जिंदगी की २” या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री हीना खान आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.

हीना लवकरच एका बॉलीवूड चित्रपटात झळकणार आहे. बॉलिवूडमधील पदार्पणाच्या या बातमीला स्वतः हीनाने होकर दिलाय. ती म्हणते, हो, मी चित्रपटात काम करते आहे. या नव्या माध्यमात काम करण्यास मी खूप उत्सुक व उत्साही आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी तिने जोरदार तयारी केली आहे, ती बाईक चालवायला देखील शिकली आहे.