आपल्या पतीपेक्षा वयस्कर दिसतात ह्या बॉलीवुड मधील अभिनेत्री, एक तर आहे पतिपेक्षा इतक्या वर्षांनी मोठी …

Bollywood

मित्रांनो, “ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन” या गाण्याची ही ओळ काही लोकांच्या बाबतीत तंतोतंत जुळते. जेव्हा लोक प्रेमात पडतात, तेव्हा त्यांना दुसरे काही दिसत नाही, ना वय, ना स्वभाव ना इतर काही.समोरच्या व्यक्तीचे वय काय आहे यांनी त्यांना काही फरक पडत नाही. आजच्या या लेखामध्ये, आम्ही बॉलीवूडच्या अशा काही अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी आपला मुलगा शोभतील, अशा वयाचे जोडीदार निवडले आहेत.

प्रियांका चोप्रा:- अलीकडेच देसी गर्ल प्रियंका चोप्राने अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केले. २०१९ मध्ये झालेल्या या लग्नसोहळ्याची चर्चा झाली आहे. प्रियांका चोप्रा हिच्यापेक्षा तिचा पती निक जोनस हा १० वर्षानी लहान आहे.जिथे प्रियांकाचे वय ३६ वर्षे आहे, निक २६ वर्षांचा आहे. जेव्हा दोघांनी विवाह केला, तेव्हा लोक त्यांच्या वयातील अंतर बघून त्यांची चेष्टा करतात, पण त्या दोघांवर कोणताही प्रभाव पडला नाही आणि आजही ते आनंदी जीवन जगत आहेत.

अमृता सिंग:- सैफ अली खान यांची बॉलीवूडमधील ओळख ही एक छोटा नवाब म्हणून आहे. आपल्या सर्वाना माहित आहे की सैफने प्रथम विवाह अभिनेत्री अमृता सिंगशी केला होता. त्यांचा या लग्नाची देखील त्याकाळी मोठी चर्चा झाली होती, त्याचे कारण अमृतासोबत लग्न करताना सैफचे वय होते, फक्त २१ वर्षे. अमृता सैफपेक्षा १३ वर्षांनी मोठी होती. ज्यावेळी त्यांचे लग्न झाले, तेव्हा अमृता ३४ वर्षांची होती.

ऐश्वर्या राय:– अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी २००७ मध्ये लग्न केले होते. ऐश्वर्या ही अभिषेकपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. ऐश्वर्याचे वय ४५ वर्षे आणि अभिषेकचे वय ४३ वर्षे आहे. असे असूनही, दोघेही खूप समजूतदार आहेत आणि सध्या ते आपले जीवन आनंदात जगत आहेत. पण दोन वर्षाचे अंतर म्हणून देखील काही लोक या लग्नामुळे त्यांची टिंगल करतात.

अर्चना पुरण सिंह:- अर्चना पुरण सिंह ही बॉलीवूडमधील अभिनेत्री आपणास अनेक हिट चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसली आहे आणि तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आपल्या माहितीसाठी आम्ही सांगतो की अर्चना पुराण सिंहने आपल्यापेक्षा ७ वर्षानी लहान असलेल्या परमीत सेठीबरोबर लग्न केले आहे. त्यांच्या वयामधले अंतर थोडे जास्त आहे, परंतु दोघांमधील प्रेम खूपच चांगले आहे.

नम्रता शिरोडकर:- नम्रता शिरोडकर एके काळी एक बॉलीवूडची हिट अभिनेत्री होती. नम्रताने “कच्चे धागे” आणि “वास्तव” सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. मिस इंडिया असलेली नम्रता हिने आपल्या फिल्मी कारकिर्दीची सुरवात “जब प्यार किसी से होता है” या चित्रपटापासून केली होती.

२००४ मध्ये आलेल्या “रोक सको तो रोक लो” या चित्रपटामध्ये लेखिकाच्या भूमिकेत शेवटच्या वेळी ती दिसली. नम्रताने साउथ सुपरस्टार महेश बाबूशी विवाह केला आहे, ज्यांचे वय तिच्यापेक्षा ४ वर्षांनी तिच्यापेक्षा लहान आहे.