आपल्या खऱ्या आयुष्यातील पत्नीची आठवण काढून दुखी झाले अनुपम खेर,म्हणाले-‘तुझी खूप आठवण येते ’

Bollywood

बॉलिवूडमधील रीमा लागू यांचे नाव एकले तर आपल्या मनात आदर आणि प्रेमळ आईची प्रतिमा लक्षात येईल.रिमा जी बॉलिवूडमध्ये बर्‍याच वर्षांपासून काम करत होती आणि त्यांनी चाहत्यांना त्यांच्या अभिनयाचे वेड लावले होते रीमा लागूने आई किंवा वैह्नी सारख्या भूमिकेतून बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. हम आपके है कौन मधील ही सर्व पात्रे खूप प्रसिद्ध झाली आणि या चित्रपटाने कटुंबाची एक नवीन व्याख्या लोकांना समजावून दिली होती. लोकांना रीमा यांचे सगळे भूमिका खूप आवडतात. वर्ष 2017 मध्ये रीमा यांनी जगाला निरोप दिला.

त्यांच्या अकस्मात मृत्यूने बॉलिवूडला धक्का बसला वयाच्या 59 व्या वर्षी रीमा लागू कार्डिअर अरेस्टमुळे त्यांचे  नि धन झाले. 17 मे 2017 रोजी दुपारी 1 च्या सुमारास त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनुपम खेर यांनी रीमा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या ऑन स्क्रीन पत्नीची आठवण काढली आहे अनेक चित्रपटांमध्ये अनुपम खैर यांनी रीमा लागू यांच्याबरोबर काम केले.

अनुपम खेर यांनी ट्विटरवर अभिनेत्री रीमा लागूची आठवण काढली त्यावेळी रीमा लागूची पुण्यतिथी होती त्या दिवशी अनुपम खेर यांनी ट्वीट करून लिहिले की मला रीमा लागूची आठवण येते. तसेच त्यांनी यावेळी रीमा यांचा सिंहासन या त्यांच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा फोटोही शेअर केला आहे. ट्विट पहा असं म्हणतात की निरुपा रॉय आणि राखी गुलजार नंतर रीमा ही एकमेव अभिनेत्री राहिली आहे जिने आईची प्रभावी भूमिका साकारली होती. मुख्यत: सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे शाहरुख खान आमिर खान आणि संजय दत्त सारख्या मोठ्या स्टार्सच्या देखील त्या आई झाल्या होत्या.

रीमा लागू आणि अनुपन खेर या जोडीला पडदा खूपच आवडला आणि अनुपम खेर यांच्या म्हणण्यानुसार रीमा लागू एक अतिशय जिवंत व्यक्ती होती तिच्या अभिनयाचे कौतुक करताना अनुपन खेर म्हणाले की रीमा जी एक उत्तम अभिनेत्री होती. आम्ही जुड़वा, गुमराह, कुछ-कुछ होता है, दीवाना मस्ताना, वंश, पापा कहते हैं, शोला और शबनम , श्रीमान आशिक, झूठ बोले कौवा काटे, प्रेम ग्रंथ,आणि हम आपके हैं कौन अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. हम आपके है कौन मधील समधीयोच्या या जोडीने कोमल कटुंबाची व्याख्या दिली आणि चित्रपटामधील त्यांची भूमिका लोकांना चांगलीच आवडली होती.

दरम्यान अभिनेते अनुपम खेर यांच्या आईसह कुटुंबातील तीन जणांना करोनाची लागण झाली होती. परिणामी त्यांना उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु या प्रकरणातील लक्षात घेणारी बाब म्हणजे अनुपम खेर यांच्या आईला त्या करोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले नाही.

ते म्हणाले की माझा भाऊ वहिनी आणि पुतणी यांना देखील करोनाची ला गण झाली आहे. त्यांच्यावर योग्य प्रकारे उ पचार सुरु आहेत. यामुळे ते लवकर बरे देखील होत आहेत. परंतु या वातावरणात मला आईची फार चिंता वाटते. कारण रुग्णालयात उपचार घेताना देखील ती शांत राहात नाही. ती सतत आमची चिंता करत असते.

त्यामुळे आम्ही आईला तिला करोना झाल्याचं सांगितलेलं नाही. पण आसपासचं वातावरण पाहून कचादित तिला कळतंय की ती इथे का आली आहे. अशा शब्दात अनुपम खेर यांनी आपल्या चाहत्यांसमोर त्याचं मन व्यक्त केल. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.