आपल्याच मामा सोबत लग्न करू इच्छिते सैफ अली खानची मुलगी ‘सारा अली खान’…

Bollywood

सारा ही बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानची मुलगी आहे. सारा अली खानने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये 2 चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सैफ अली खान आपल्या मुलीसह करण जोहरच्या शो कॉफी विथ करण मध्ये आला होता. करण शोमध्ये साराला विचारतो की तुला कोणाशी लग्न करायचं आहे. तर त्यावर साराने दिलेल्या उत्तरामुळे सैफ अली खानसह करण जोहरलाही तिच्या उत्तरामुळे धक्का बसला.

उत्तर देताना साराने बॉलिवूड हँडसम अभिनेता रणबीर कपूरचे नाव घेतले. पण रणबीर तर नात्याने तिचा मामा असल्याचे दिसते. आता तिची ही इच्छा पूर्ण होऊ शकते का नाही हे पाहावे लागेल.रणबीर कपूरसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या सारा अली खानला आता बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करायचे आहे. तिने असेही म्हटले आहे की ती बऱ्याच काळापूर्वी रणबीरला पसंत करत होती पण आता त्याला डेट करायला तिला आवडणार नाही. एका रेडिओ चॅनलवरील शो दरम्यान सारा अली खानने हे सांगितले.

यांनतर सारा तिच्या चित्रपटाचा प्रचार करत असलेल्या एका रेडिओ चॅनल शोमध्ये आली होती. या चॅनल मधील आर.जे.मलिष्काने जेव्हा साराला विचारले की तुला रणबीर कपूरसोबत लग्न करायचे आहे पण कार्तिक आर्यनला डेट करायचे आहे तर असे का? तर याविषयी साराचे उत्तर आश्चर्यकारक होते.

सारा म्हणाली मी बऱ्याच वर्षांपूर्वी रणबीर कपूरसोबत लग्न करायचे आहे असे सांगितले होते. जेव्हा पापाने शो वर हे सांगितले तेव्हा मी ते नाकारले नाही कारण असे करणे खूपच मूर्ख वाटत होते. लोकांना आम्ही निर्णय बदलतो असे वाटेल. आता मला कार्तिकला डेट करायचे आहे. कार्तिक खूप क्युट दिसतो असे सारा म्हणाली.

जेव्हा आरजे मलिष्काने तिला विचारले की ही गोष्ट आम्ही कार्तिकला सांगावी का तेव्हा सारा अली खान त्यांना म्हणाली की कृपया त्याला सांगा लवकरात लवकर सांगा. त्याचबरोबर साराने मलिष्काला कार्तिकच्या घरचा पत्ता पाठविण्यास सांगितले.

सारा ही सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांची मुलगी आहे. तिने केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या या पहिल्या चित्रपटात तिने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत काम केले होते. त्यानंतर तिने लव आज कल २  सिंबा या चित्रपटांमध्ये काम केले. आता तिचा कूली नंबर १ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आता अभिनेत्री सारा अली खान हिच्या घरातदेखील करोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आली आहे. साराने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. साराने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या ड्रायव्हरला करोनाची लागण झाल्याचे  तिने सांगितले आहे. या कारचालकाला क्वारंटाइन सेंटरमध्ये नेण्यात आले असून साराच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह आल्याचे तिने सांगितले आहे.

आमचा कारचालक करोना पॉ झिटिव्ह आढळून आला आहे. बीएमसीला याविषयी कळवलं असून कारचालकाला क्वारंटाइन सेंटरमध्ये नेण्यात आलं आहे. माझे कुटुंब व घरातील स्टाफ आणि माझी करोना चाचणी करण्यात आली आहे. परंतु आमच्या सगळ्यांचे करोना रि पोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तरीदेखील आम्ही काळजी घेत आहोत. अशी पोस्ट साराने शेअर केली आहे.